Homeराजकीयरिपब्लिकन सेना विधानसभा लढणारच

रिपब्लिकन सेना विधानसभा लढणारच

🌸रिपब्लिकन सेना विधानसभा लढणारच🌸
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर सेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब, यांनी रविवार दि. 20 ऑक्टोबर 2024 डॉ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन, दादर पूर्व. येथे महाराष्ट्र कमिटी, विभागीय कमिट्या व सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्षे यांची संयुक्त बैठक घेऊन काही संकेत दिले. त्या अनुषंगाने मुंबई 24 लाईव्ह या चॅनेलचे संपादक प्रशांत खंदारे हे माझ्या टिटवाळा येथील कार्यालयात आले व मला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेनेची भूमिका काय राहणार? या विषयावर काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने मी जी उत्तरे दिली किंवा पक्षाची भूमिका विशद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जे बैठकीला उपस्थित नव्हते किंवा मुख्य बैठकीनंतर जी सर्वोच्च निर्णय समितीने जे निर्णय घेतले त्याचा ढोबळ मानाने गोषवारा हा त्यांच्या लक्षात येईल. महाराष्ट्र कमिटीचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला जे फोन येत आहेत त्यावरून रिपब्लिकन सेनेचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व इच्छुक उमेदवार संभ्रमात व अस्वस्थ आहेत असे जाणवते. सर्व पक्षांच्या भूमिका व उमेदवार याद्या जाहीर होत आहेत, आपल्याला निर्णय घ्यायला उशीर होत आहे असा त्यांचा गैरसमज होत असलेला दिसतो; परंतु एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी सर्वांच्या लक्षात आणून देतो की, आपले साहेब अजिबात स्वस्थ बसलेले नाहीत. आपल्याला पक्षाची जेवढी चिंता आहे त्याच्यापेक्षा हजार पटीने जास्त साहेबांना आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त चिंता साहेबांना कार्यकर्ते आणि समाजाची आहे. आज सर सेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब व त्यांनी स्थापन केलेली रिपब्लिकन सेना ही आंबेडकरी चळवळीतीच्या दृष्टीने एकमेव आशास्थान उरलेले आहे. तेव्हा निर्णय घेताना सर्व बाजू तपासून बघाव्या लागतात; कारण आता जर निर्णय चुकला तर त्याचे परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. एवढे मात्र नक्की की, साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय समाजाच्या हिताचाच असेल. तेव्हा रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व इच्छचक उमेदवार यांनी निश्चिंत राहावे.

               श्रीपती ढोले, मुंबई
             महाराष्ट्र प्रदेश सचिव
              रिपब्लिकन सेना
           मो. 9834875500
            W. 8888578874
RELATED ARTICLES

Most Popular