Homeलेख**भ्रष्टाचारांचे निवडणुकांना ग्रहण **

**भ्रष्टाचारांचे निवडणुकांना ग्रहण **

भ्रष्टाचारांचे निवडणुकांना ग्रहण !

सुरवातीला कोणत्याही प्रकारच्या निवडणूक प्रतिक्रियेतून लोकप्रतिनिधी निवडले जात नव्हते.
राजा, राणीच्या पोटी राजा जन्माला येत होता.मग तो कसाही असो.तोच त्याच्या पध्दतीने जनतेवर राज्य करीत होता.मग तो कसाही असला तरी राज्य चालवावे लागत होते.

ज्या वेळी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाल्या नंतर
.डाॅ.बाबासाहेबांनी लिहिलेली घटना देशाने स्विकारली. त्या वेळेपासून सर्व जाती धर्माच्या लोकांना समान मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी प्राप्त करून दिला.मग तो.गरीब असो या श्रीमंत असो. सर्वांना समान हक्क, न्याय मिळवून दिला.
त्या वेळे पासून आज पर्यंत माझ्या वयाच्या 70 ते‌ 71 वर्षांच्या कालावधीत अश्या प्रकारच्य निवडणूका मी पाहिलेल्या नव्हत्या.

पुर्वी निवडणुकीत उमेदवारांच्या कर्तुत्वाचा लेखाजोखा केला जात होता.त्याचं शिक्षण, चारित्र्य संपन्नता, निस्वार्थीपणा,तळागाळातील सर्व सामान्य जनतेबदल असलेली तळमळ, कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला, सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला असायचा.

मतदार राजा ही सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार करून.कोणत्याही अमिषाला बळी न पडता.निस्वार्थ पणे परिपुर्ण विचार करून बॅलेट पेपरवर मतदान करीत होता.

निवडणुकीच्यावेळी मतदारांनी मतदान प्रक्रियेतून लोक प्रतिनिधी म्हणून निवडून दिला की तो जनतेची आणि देशाची मनोभावे सेवा करुन जनतेचा,देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अहोरात्र कार्यरत असायचा.

शासकीय यंत्रणा हाताशी धरून किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या दबावतंत्राचा वापर केला जात नव्हता.
त्यामुळे सर्व शासकीय क्षेत्रातील यंत्रणा कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होता.सर्व जाती धर्मातील जनता समाजात देशात गुण्यागोविंदाने शांततेने नांदत होती. कायद्याची भिती असल्याने कोणावरही अन्याय होत नव्हता.शासकीय यंत्रणांच्या वर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जात नव्हता.त्या मुळे शासकीय यंत्रणा नियमानुसार कार्यवाही करीत असल्याने कोणावरही अन्याय होत नव्हता.

सध्या लोकप्रतिनिधींचा सर्व शासकीय
यंत्रणांच्या वर सर्व प्रकारच्या दबावतंत्राचा गरजे पेक्षा जास्त प्रमाणात हस्तक्षेप करून जनतेच्या हितासाठी असलेल्या यंत्रणांचा वापर स्वतः च्या हितासाठी करीत असल्याचे दिसून येते.हवा तसा मर्जी प्रमाणे केल्यामुळे त्यांचे स्वायत्तता निकामी करण्याचे काम सातत्याने लोक प्रतिनिधी करीत असल्याचे दिसून येते. कोणत्याही क्षेत्रातील यंत्रणांची स्वायत्तता, स्वातंत्र्य लोकप्रतिनिधींनी अबाधित ठेवलेली नाही. त्यामुळे सामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास ढासळत चालला आहे.न्याय हक्कापासून जनता घायाळ होऊन शासकीय यंत्रणेच्या नावानं ढसा, ढसा रडती आहे.
सध्याच्या निवडणूकितील उमेदवार म्हणून निवडणूकिच्या रिंगणात उभे असलेले दिसून येताहेत.
वडीलांच्या विरुध्द मुलगी, काकांच्या विरुद्ध पुतण्या, सासऱ्याच्या विरुद्ध सुन, नणंदेच्या विरुद्धात भावजय, पतीच्या विरुद्ध पत्नी , निवडणूक लढवीत आहेत.
ही कोणती?लोकशाही.मतदारांनी यांचा काय आदर्श घ्यायचा.

वडिलांचे निधन झाल्यानंतर वडीलांच्या नावावर असलेली जमीन जुमला वारसांच्या नावावर चढवली जात होती.

त्याच पध्दतीने ज्याच्या घरी अनेक वर्षांपासून राजकीय वारसा हक्का प्रमाणे एकाच घराण्यातील चालतं आलेल्या घराणेशाही दिसून येते.वडील झाला की आई,आई झाली की मुलगी, मुलगी झाली की मुलगा, बहिण, भाऊ,सुन, अशी वंशावळ चालत असल्यामुळे लोकशाही ही साचलेल्या खड्यातील पाणी कुजून जंतूंची निर्मिती होऊन दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. आयुष्यभर संतरंज्या आणि खुर्च्या उचलण्यासाठी कार्यकर्त्यांचा वापर केला जात असल्याने. प्रामाणिक कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. सध्याचे उमेदवारही जनतेचे उमेदवार राहिलेले नाहीत.

निवडणुका म्हणजे कमी कालावधीत संपत्ती मिळविण्याचा एक मोठा उद्योगधंदा झाला आहे.निवडणुकीत पैसा गुंतवायचा आणि पाच वर्षांत
एकदा उमेदवार निवडून आला की शासकीय यंत्रणा हाताशी धरून विविध विकासकामांच्या नावाखाली स्वतःचा विकास आणि जनतेला भकास करून वाऱ्यावर सोडायचं.
शासकीय तिजोरीवर नियोजित रित्या दरोडा घालून तिजोऱ्या रिकाम्या करायचा कार्यक्रम चाललेला दिसून येतो आहे .
सदरची चाललेली देशाची लूटमार ही ई.डी.कार्यालयाला,सी.बी.आय.कार्यालयाला., इन्कम टॅक्स, कार्यालयाला.
इत्यादी सर्व यंत्रणांना माहिती नसते का ॽ
उदाहरणार्थ मांजर ज्या वेळी दुध पीत असते.त्यावेळी ते डोळे बंद करून दुध पीत असते.तेंव्हा त्याला वाटते.माझे डोळे बंद आहेत.म्हणजे पहाणाऱ्यांचे डोळे बंद आहेत.अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
तर या सर्व यंत्रणानांच्यावर सत्ताधाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करून त्यांना हातातील बाहुले बनवलेल्या चे दिसून येत आहे.

सत्तेच्या स्वार्थापोटी आमदार ही विकले जात असताना दिसून येताहेत.
जनतेच्या सेवेतून केलेल्या कर्तुत्वावर निवडणुकीमध्ये मताधिक्य मिळवून विजयी होण्याऐवजी.
वाम मार्गाने मिळविलेल्या संपत्तीच्या जोरावर निवडणूका लढवल्या जाऊन विजयी होत आहेत.

निवडणुकीच्या वेळी विजय होण्यासाठी .उमेदवारांच्यात
पैसा गुंतवणूक करण्याकरिता जणू काही स्पर्धाच लागलेल्या दिसून येताहेत.
प्रत्येक उमेदवार निवडणुकीच्या वेळी खोटी आश्वासने, खोटे वचननामे प्रसिद्ध करीत असतात.
सध्या उध्वभवणाऱ्या परिस्थिती नुसार मतदार ही लाचार होऊन विकले जावून मतदान करीत आहेत.
त्यामुळे प्रामाणिकपणे समाज्याच्या कल्याणासाठी निस्वार्थी पणे काम करणाऱ्या राजकीय सत्ता संपुष्टात आली आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लोकशाहीचा मुख्य उद्देश होता.की सुशिक्षितानी निवडणूकिच्या प्रक्रियेत सहभागी‌ होऊन भाग घेतला पाहिजे.
पण ते सहभागी होत नाहीत.जो पर्यंत तत्वनिष्ठ सुज्ञ नागरिक राजकीय क्षेत्रात निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही तर लोकशाहीचे भवितव्य धोक्यात येईल! सुशिक्षित लोक यांच्याशी आपलं काय देणं घेणं आहे.अशी प्रतिक्रिया व्यक्त करत ते मतदानाच्या दिवशी सहकुटुंब बाहेर फिरायला जातात.मतदान करत नसतात.नंतर पाच वर्षे फक्त वायफळ चर्चा करीत असतात.सर्व मतदारांनी सद्सदविवेक बुध्दीने विचार पुर्वक मतदान करणे ही काळाची गरज आहे.तरचं देशाची लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मदत होईल!

.पण सज्जन माणसं या प्रक्रियेत सहभागी न झाल्यामुळे लोकशाहीला काळीमा फासणारी गद्दार उमेदवार लोक प्रतिनिधी म्हणून निवडून येत असल्यामुळे दिवसेंदिवस लोकशाहीचे मारेकरी ठरत आहेत.हे जर थांबवायचे असेल तर सुज्ञ मतदारांनी स्वतः च्या शरिरावर स्वतः चे डोकं ठेवून मतदानाच्या दिवशी योग्य विचार पुर्वक बटणं दाबले की गद्दारांना राजकीय क्षेत्रातून अलगद उचलून बाजूला फेकता येईल!

निवडणुक प्रक्रिया ही संपूर्ण पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे.मतदानाच्या वेळी प्रसार माध्यमातून हाणामारीचे, पैसे वाटण्याचे, एकमेकावर दादागिरी,हुलडबाजी,खूण करण्याच्या धमकीचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहून सर्व सामान्य माणसाला तीव्र वेदना होतात. याला लोकशाही म्हणायचे का ॽ

हे सर्व पाहून सुशिक्षित तरुण बांधवांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या आयुष्यातील भविष्याचा फक्त एकदा अंतर्मुख होऊन विचार करा.हे राजकीय नेते पोलिस संरक्षणात सुरक्षित असतात.बहुजन समाजातील तरुण मुलांच्या हातात काठ्या, तलवारी,दगड, देऊन माती भडकवतात.आणि प्राण पणाला लावून भाग घेता.शेवटी तुमच्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळे तुम्हाला चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने तुमचे जीवन उद्ध्वस्त होते.कधीतरी विचार केला का?
देशाची सर्व सुत्रे मनुवादी व्यवस्थेच्या हातात आपण दिलेली आहेत.याला जबाबदार आम्हीच आहोत.कारण त्यांची मुले रस्त्यावर उतरून कधी आंदोलन केली आहेत का ॽ नाही ती वायफळ वेळ न‌ घालविता फक्त अभ्यास करून क्लास वन अधिकारी न्यायाधीश, सचिव, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक, उच्च पदाधिकारी होऊन देशाची सर्व यंत्रणा त्यांच्या हातात.आणि बहुजनांची मुलं नशिबाला दोष देत घरी रडत बसतात.

डॉ. बाबासाहेब म्हणतात.ज्या दिवशी धर्माचे राजकारण केले जाईल!
त्या दिवशी प्रथम लोकशाही व त्या नंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल!!

देशातील गोरगरीब, शेतकरी जनतेच्या
कष्टातून कर शासकीय तिजोरीत किंवा बॅंकेत जमा होत असतो. तो लुटण्यासाठी अनेकांनी नियोजित रित्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे देशाच्या बॅंकेतून लाखों कोटींच्या रक्कमा घेऊन. सुरक्षितरित्या प्रदेशात पळून जाऊन आनंदाने जीवन ते जगत आहेत.
आणि दुसरीकडे देशातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी बांधवांना सर्व कागदपत्रे सादर करूनही बॅंकेतून कर्ज मंजूर होत नाहीत.हा कोणता न्याय म्हणायचा!
लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील विकास कामासाठी शासकीय तिजोरीतून जो निधी मंजूर करून. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणलेला असतो.त्याची जाहिरात बाजी करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही.निधीची सर्वत्र चर्चा केली जाते.उमेदवाराच्या टक्केवारीची किंवा त्याने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत कोणी बोलत नाही.मतदारांनी विकासकामं करण्यासाठीच उमेदवारांना निवडून दिलेले असते ना!.विकास करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.

सदरचे पैसे जनतेच्या कष्टातून शासकीय तिजोरीत आलेले असतात.
तेंव्हा त्याची प्रसिद्धी कशासाठी.
व्यक्तिगत स्वतः च्या कष्टातून मिळविलेला पैसा जनकल्याणासाठी खर्च केला असेल तर प्रसिद्धी करणे योग्य आहे .

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्लेटोनी राजकारणी लोकांविषयी जे मत मांडले होते.त्या वरती IAS
च्या मुलाखतीला आलेल्या विद्यार्थ्याला मुलाखतीच्या वेळी
प्लेटोनी मांडलेल्या मतावरती प्रश्न विचारला गेला. त्या वेळी त्यांनी आपलं मतं मांडले‌ होतं की राजनीति में हिस्सा न लेने का सबसे बडा दंड यह है कि मुर्ख व्यक्ति आप पर शासन करते है!

मोठ्या उद्योगपतींना खुष करण्यासाठी लाखों कोटींचे पॅकेज देऊन कर्ज माफ करायचं.आणि गोरगरीबांच्या घरी बॅंकेचे हप्ते थकले म्हणून जप्तीच्या नोटीस बजावून गोरगरीबांची संपत्ती जप्त कारायची. प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करीत असणाऱ्यांना त्रास द्यायचा का?
कायदा हा नेहमी गोरगरीबांच्या घरापर्यंत जात असतो.गर्भ श्रीमंत गाडी बंगले वाल्यांच्या कडे कधी जात नसतो.
कायद्या समोर सर्वजण समान असतात.हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी म्हणायचे असते का?.
कायदा सर्वांना समान आहे.कायद्या पेक्षा कोणीही मोठा नाही. असं फक्त म्हटले जाते

निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ.अशा विविध प्रकारच्या योजनांची खैरात केली गेली जाते. कोणतीही जनकल्याण कारी योजना राबवित असतांना त्याचे दूरगामी दुष्य परिणाम काय होतील! याचा विचार केला गेला पाहिजे.
सदचा पैसा कोणाच्या घरातील नसून तो सर्व सामान्य जनतेच्या कष्टातून शासकीय तिजोरीत जमा झालेला असतो.तो पैसा जनतेचाच असल्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने कल्याणकारी योजना राबविल्या पाहिजेत.त्या सर्व सामान्य जनतेच्या हाताला कामधंदा उपलब्ध करून देणाऱ्या असल्या पाहिजेत. महिलांच्या आणि बांधवांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्या.त्यासाठी बिनव्याजी पैसा उपलब्ध करून द्यावे.
सर्वजण बसून खायला लागले तर कष्ट
करणार कोण? ज्याना शासनाने दिल्या शिवाय जगण्याचा दुसरा पर्याय नाही.त्यांना भरपूर द्या.शेतकऱ्यांना त्यांच्या शेती मालाला उत्पादनाशी निगडित हमी भाव द्या.रासायनिक खंताचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा.जेष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा.कारण जगाचा अन्नदाता किंवा पोशिंदा आहे.हे कोणालाही नाकारता येणार नाही.जेणे करून शेवटचे दिवस त्यांना चांगले जगण्यासाठी मदत होईल!

जनतेला श्रमाचे महत्त्व कळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.बिन कष्टाचे मिळत राहिले की त्याला त्याच्या श्रमाचे महत्त्व कधीच कळणार नाही.
या जगात श्रम केल्या शिवाय कोणालाही काहीच मिळालेले नाही.श्रमातून देशाच्या उत्पादनात वाढ होऊन देशाची झपाट्याने प्रगती होवू शकते.!
कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता.बसून खायची सवय एकदा माणसाला लागली तर माणूस हा सवयींचा गुलाम बनून आळशी बनेल.कष्ट न केल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येईल.! आणि कष्टाशिवाय प्रगती कशी होणार?
सुशिक्षित तरुणांनाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे.रोजगार उपलब्ध नसल्याने नोकरी नाही नोकरी नाही, म्हणून छोकरी नाही.त्यामुळे लग्न जमत नाहीत.मुला मुलींचे वयोमान वाढून त्यांचें जीवन उद्ध्वस्त होत आहे.याचाही प्रामुख्याने शासन दरबारी विचार करणं गरजेचं आहे.

लोकप्रतिनिधींनी व्यक्ती गत स्वतः चे हित बाजूला ठेवून.जनतेच्या कल्याण कारी योजना राबवून देशाचा झपाट्याने विकास कसा करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे.

देशहिताच्या दृष्टीने नेहमी प्रत्येक लोक प्रतिनिधींनी विचार विनमय करून वाटचाल केली पाहिजे.
विविध प्रकारची आमिष दाखवून. सर्वत्र पैसाचा मुसळधार पाऊस पाडून . लोकशाहीला लाचार बणवून विजयी होण्याच्या स्पर्धा लावण्या पेक्षा निस्वार्थी पणे जनहितार्थ आणि देश‌ हितार्थ काम करुन लोकशाही अधिकाधीक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे.

प्रसिध्द व्यंगचित्रकार आणि तत्वज्ञानी ‌व्यंग चित्राकृती खाली. त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
गेल्या खेपेस मी एका पक्षाच्या गुंड आणि निष्क्रिय उमेदवाराला मत दिलं होतं!
या वेळी मात्र मी दुसऱ्या एका पक्षाच्या गुंड आणि निष्क्रिय उमेदवाराला मत दिलं!!

सध्या एकमेकांच्या पसंती प्रमाणे मुलं आणि मुली पळून जाऊन लग्न करून संसार मांडतात.आणि तो संसार टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात.
त्याच प्रमाणे आता आमदार ही दुसऱ्या पक्षाच्या घरात पळून जाऊन संसार मांडत आहेत.पण तो संसार टिकवतील याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही.
प्रत्येक पक्षाच्या झेंड्याचा रंग वेगळा, चिन्ह वेगळे, .झेंडे वेगळे, असले तरी सर्वांची प्रवृत्ती एकच दिसून येते! आम्ही सर्वजण राजकारणातील भाऊ,भाऊ मिळेल तेथे खात राहू.
आणि मतदारांना उल्लू बनवित राहू.

संगोपन करून लहानाचे मोठे केलेल्या बापाचा फोटो घेऊन
स्वतः च्या बापाचा फोटो घरातचं ठेवून.
दुसऱ्या कोणत्याही बापाच्या घरी जाऊन संसार मांडतील यांची कोणालाच गॅरंटी देता येत नाही.

याचा सर्व मतदार बंधू बहिणींनी आणि उमेदवारांनी सद्सदविवेक बुध्दीने विचार करावा. अशी माझी आपणास नम्र विनंती आहे .

देशमुख पी. आर.

9921111955

निवडणुकीच्या प्रक्रियेतून

RELATED ARTICLES

Most Popular