Homeलेखविश्वकर्मीय सुतार समाजात नेतेगिरी करणारे समाज नेते राजकीय दृष्टीने दिशाहीन आहेत!.

विश्वकर्मीय सुतार समाजात नेतेगिरी करणारे समाज नेते राजकीय दृष्टीने दिशाहीन आहेत!.

विश्वकर्मीय सुतार समाजात नेतेगिरी करणारे समाज नेते राजकीय दृष्टीने दिशाहीन आहेत!.

    विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करणाऱ्या असंख्य सामाजिक संघटना,संस्था,प्रतिष्ठान तर काही प्रमाणात विविध विकास मंच,युवक संघटना सुद्धा समाजात हिरीरीने कार्यरत असतील या सर्वच संघटनेवर कारभारी म्हणून सुशिक्षित उच्चशिक्षित आणि विद्वान हुशार बुद्धिवान समाज बांधवांची पदाधिकारी म्हणून निवड केली जाते याच माध्यमातून एका कर्तबगार पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते नंतर हळूहळू समाजात कर्तबगार कर्तृत्ववान कार्यसम्राट दिग्गज आणि धडाकेबाज युवक नेतृत्व म्हणून समाजात नेतेगिरी करतात किंबहुना समाज नेतृत्व म्हणूनच सुतार सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमात आनंदाने मानसन्मान मिळवतात.

   घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे कि,शासनकर्ती जमात बना आपले संवैधानिक हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी राजकीय हिस्सेदारी मध्ये सहभाग महत्वाचा ठरतो आणि वैचारिक चळवळ महत्वाची ठरते.विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाची लोकसंख्या राज्यात लक्षणीय असल्याचे सोशल मीडियावर माझ्या वाचण्यात आले आहे आणि सामाजिक संघटनांचा विस्तार हा राज्यस्तरीय असल्याचे समजले जाते राज्यातील सामाजिक संघटनांची संख्या जवळपास 200 असेल या संघटनांवर शेकडोंच्या संख्येने कर्तबगार बुद्धिवान सुशिक्षित उच्चशिक्षित पदाधिकारी वर्गाची वर्णी लागलेली असेल याच माध्यमातून समाजात अनके दिग्गज नेते आणि युवक नेते उदयास येतात आणि सामाजिक क्षेत्रात नेतेगिरीच्या आवेशात मोठया दिमाखात वावरतात.

    समाजात एखादी संघटना स्थापन करून समाजात सर्व समाजमान्य नेतृत्व उदयास येणार नाही त्यासाठी ठोस अजेंडा असावा लागतो आणि विधायक कार्याचा कृती आराखडा असणे गरजेचे असते, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते, कोणत्या राज्यस्तरीय संघटनेकडे सर्वांगीण विकासासाठी,ओबीसी चळवळ तसेच राजकीय चळवळ बळकट करण्यासाठी ठोस अजेंडा आहे. आणि कदाचित असेल तरीही फक्त कागदोपत्री असेल जमिनीवर मात्र अजिबात नसेल मग राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करून समाज नेतेगिरीचे फलक झळकवून फोटोबाजीच्या माध्यमातून समाजात कार्यसम्राट समाज नेतृत्व कोणत्या नैतिक आधारावर उदयास येईल. यावर स्वयंघोषित नेत्यांनी स्वतःआत्मचिंतन करावे आणि बुद्धिवान सुतार समाजाची दिशाभूल करु नये. 

    विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी प्रवर्गातील ओबीसी घटक असतांना समाजात ओबीसी संदर्भात आरक्षण जनगणना संविधान तसेच राजकीय हिस्सेदारी राजकीय प्रतिनिधित्व इत्यादी महत्वपूर्ण विषयावर तथाकथित समाज नेत्यांनी राज्यभरात आपापल्या कर्तबगार नेतृत्वाखाली राज्यभरात हजारोंच्या संख्येने समाज बांधवांना एकत्रित करून समाज जागरूकता अभियान राबविण्यात आले काय शिवाय समाजात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी तळागाळातील उपेक्षित सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्दोग व्यवसाय उभारणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले काय याचा विचार करण्याची नितांत गरज आहे.फक्त नावाला आणि कागदोपत्री एखादी संघटना स्थापन करून शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी वर्गाची निवड करून समाजात कर्तबगार कर्तृत्ववान दिग्गज नेतृत्व आणि युवक नेतृत्व उदयास येणार नाही.

   विश्वकर्मीय राज्यस्तरीय सुतार समाजात विविध छोट्या मोठ्या कार्यक्रमात फोटोबाजी करून समाज नेतेगिरीचा मनमुरादपणे आनंद लुटला असेल समाज नेतेगिरीच्या थाटात वावरले असतील अशा किती तथाकथित स्वयंघोषित समाज नेत्यांनी समाजात राज्यातील तळागाळातील आणि उपेक्षित खेड्यातील कष्टकरी सुतार समाज बांधवांना तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय उभारणी केलेले आहेत आणि ओबीसी जनगणना आरक्षण राजकीय हिस्सेदारी संदर्भात समाजात समाज जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत शिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी केली होती हा संशोधनाचा विषय आहे सोबतच तथाकथित नेत्यांनी सुद्धा आत्मचिंतन करावे.

    समाजातील सुशिक्षित उच्चशिक्षित बुद्धिवान तसेच चिकित्सक समाज बांधवांनी यावर सखोल निरीक्षण करणे गरजेचे आहे विशेषतः स्वयंघोषित नेत्यांनी समाजात विविध विषयांवर समाज जागृती निर्माण करण्यासाठी अजिबात प्रयत्न केले नाहीत कारण समाज जागृत झाला तर स्वयंघोषित नेत्यांना उजळमाथ्याने नेतेगिरीचा मनमुरादपणे आनंद लुटला येणार नाही.समाजात सुशिक्षित उच्चशिक्षित आणि बुद्धिवान समाज वर्ग जागृत आणि चिकित्सक असतो अशा लोकांना चिकित्सक पध्दतीने अवलोकन करण्याचे तंत्रज्ञान अवगत असते हा समजदार वर्ग कोणत्याही भूलथापांना कधीही बळी पडणार नाही जे अंधभक्त असतात त्यांना चिकित्सक पध्दतीने अवलोकन करण्याचे तंत्रज्ञान अवगत नसते म्हणूनच असा अचिकित्सक वर्ग फसतो. डोळे बंद करून भूलथापांना बळी पडतो. यासाठीच समाजाने जागरूक असावे.

   लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर मी विश्वकर्मीय सुतार समाज नेत्यांनी विश्वकर्मा राजकीय आघाडी स्थापन करावी हा माझा लेख विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाला होता. आणि सामाजिक सोशल मीडियावर सुद्धा जाहीर प्रसिद्ध झाला होता, शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा समाज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे तसेच विश्वकर्मीय सुतार समाज नेत्यांनी राजकीय अस्तित्वासाठी परिवर्तनाच्या लढाईत उतरावे अशा पध्दतीचा लेख लिहून विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाला आहे. आणि सामाजिक क्षेत्रातील सोशल मीडियावर सुद्धा अनेक वेळा जाहीर प्रसिद्ध झालेला आहे.

   याव्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रातील विविध विषयांवर सुद्धा असंख्य लेख विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेले आहेत.समाजातील कोणत्याही कर्तबगार विद्वान हुशार आणि बुद्धिवान समाज नेत्यांना माझे लेख पाहिजे असल्यास आणि संबंधित लेखावर प्रामाणिकपणे कार्यपद्धती कृतीआराखडा तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मानसिकता आणि इच्छाशक्ती असेल धाडस आणि क्षमता तसेच खरोखरच पात्रता असेल तरच संबंधित कार्यसम्राट समाज नेत्यांना माझे विविध विषयांवर प्रसिद्ध झालेले लेख पाठवू शकतो.आजही माझ्याकडे विविध विषयांवर केलेले लेख सुरक्षित आहेत कोणत्या कर्तबगार दिग्गज समाज नेत्यांना आणि कोणत्या धडाकेबाज युवक नेत्यांना लेख पाठवू बोला लगेच आपापल्या मोबाईल नंबरवर पाठवतो.

  समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा मुकूट परिधान करणाऱ्या विशेषतःसुतार समाजात नेतेगिरीच्या आवेशात वावरणाऱ्या संघटना आणि संबंधित समाज नेत्यांकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात ज्यामध्ये सामाजिक सर्वांगीण विकास,ओबीसी संदर्भात विविध विषयांवर समाज जागृती निर्माण करणे,समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी राजकीय हिस्सेदारी,राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी विधायक कार्याच्या अपेक्षा समाजात नेतेगिरी करणारे दिग्गज समाज नेते आणि धडाकेबाज युवक नेते पूर्ण करण्यात अपयशी ठरत असतील तर मग समाज कोणाकडून अपेक्षा बाळगणार जर समाजात नेतेगिरीची नैतिक जबाबदारी व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर मग फक्त नावासाठी आणि मोठेपणा मिळविण्यासाठी समाज नेतेगिरीचा अट्टाहास,खटाटोप आणि आटापिटा कशासाठी?

    विश्वकर्मीय सुतार समाजात मोठ्या दिमाखात मोठ्या आवेशात नेतेगिरी करणाऱ्या तथाकथित दिग्गज समाज नेत्यांनी आणि धडाकेबाज युवक नेत्यांनी जर समाजात समाजाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी तसेच ओबीसी संदर्भात विविध विषयांवर समाज जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले असते विशेषतः राजकीय हिस्सेदारी राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी प्रयत्न केले असते तर नक्कीच विश्वकर्मीय सुतार समाजाचे जबाबदार समाज नेतेमंडळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नक्कीच उतरले असते त्यामुळे सुतार समाजात राजकीय प्रतिनिधित्व राजकीय हिस्सेदारी संदर्भात एकप्रकारे नवचैतन्य निर्माण झाले असते आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी सुद्धा एक आदर्श निर्माण झाला असता.

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाचे पर्यायाने राज्यातील बाराबलुतेदार समूहाचे काही खासदार,आमदार समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेच्या सर्वोच्च सभागृहात आणि राज्याच्या विधानसभा सभागृहात पोहोचले असते.परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वतःला समाजाचे समाज नेतृत्व म्हणवून घेणारे कुठं हरवलेत विशेषतःविश्वकर्मीय सुतार समाजाचे मार्गदर्शक आधारस्तंभ प्रेरणास्थान धडाकेबाज कार्यसम्राट समजणारे सुद्धा कुठं हरवलेत हा संशोधनाचा विषय आहे म्हणूनच विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील एक सर्वसामान्य सुतार समाज बांधव या नात्याने जबाबदारी पूर्वकच लिहीतो आणि जबाबदारी पूर्वकच म्हणावेसे वाटते कि,विश्वकर्मीय सुतार समाजात नेतेगिरी करणारे सर्वच समाज नेते राजकीय दृष्टीने दिशाहीन आहेत!प्रमोद सूर्यवंशी :-8605569521.चिखली मातृतीर्थ बुलडाणा

RELATED ARTICLES

Most Popular