सुखाची मिरासी-संत चोखोबारायांचे जीवन चरित्र -लेखक नितीन सावंत.
संत चोखोबारायांनी आपल्या संपूर्ण जीवनात एकच अपेक्षा व्यक्त केलेली आहे, ती म्हणजे सुखाची अपेक्षा.आम्हाला तुच्छतेने वागवु नये,सतत अवहेलना करु नये,टाकुन, घालुन,पाडुन बोलु नये.आमच्याही वाट्याला आनंद,हसणे आणि सुख यावे. ही अपेक्षा संत चोखोबारा यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची आहे. संत नामदेवांमुळे योडा सुखाचा कवडसा का होइना या कुटुंबाच्या वाट्याला आला होता.पंढरपुर आणि विठ्ठल हे या सुखासाठी निमित्त ठरले होते. म्हणून पंढरपुर हे सुखाची मिराशी आहे.मिरास म्हणजे वारसा.सुखाची मिराशी म्हणजे सुखाचा वारसा. संत चोखोबाराय म्हणतात.सुखाची मिराशी । आमची हे पंढरीसी ।।
पंढरपुर हे सुखाचा वारसा सांगणारे शहर आहे.सुखाची मिराशी म्हनत अनेक अभंगांत संत चोखोबाराय सुखाचे वारसदार होऊ पहातात.या प्रकारे सुखाची अपेक्षा त्यांनी अनेक अभंगांतून केलेली आहे.सुखाचा वारसदार म्हणनारा चोखोबा शेवटपर्यंत सुखाच्या मिराशीपासून दूरच राहिला.हे मात्र दुर्देवच।
अत्यंत संवेदनाशील अंगाने लिहिलेल्या चोखोबारायांच्या पुस्तकातील वरील उतारा आहे.प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक.वारकरी संत चळवळीतला अपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवलेला संत म्हणजे संत चोखोबाराय होत.म्हणून आपण चोखोबारायांना आवर्जून वाचलं पाहिजे.सर्वांगाने चर्चा करणारे पुस्तक.सुखाची मिरासी-संत चोखोबारायांचे जीवन चरित्र -लेखक नितीन सावंत.आजच मागावा.किंमत- 225, पोस्टाचा खर्च- 50 रू. एकूण = 275 रुपये.लेखक नितीन सावंत.संपर्क : 9970744142.
सागर तायडे यांस कडून