🔴 महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळ उभारली नसती तर, अजूनही आपण त्या चातूर्वणाच्या घाण अशा सामाजिक व्यवस्थेत जगत राहिलो असतो. जिथे तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा कोणताही अधिकार नसता.
🔴 ज्यांना समाजाने नाकारलं, ज्यांना रोजगार दिला नाही, त्यांना समाजाचा भाग समजलं नाही, ज्यांना माणूस समजला नाही त्यांना हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची लढाई इथे वंचित बहुजन आघाडी लढत आहे.
🔴 इथल्या प्रस्थापितांना, धनदांडग्यांना, जातदांडग्यांना ज्यांना पुन्हा तीच व्यवस्था पाहिजे आहे, त्यांना जातीची मिजास मिरवायची आहे, त्यांना वर्चस्व पाहिजे आहे. बाहेरून लेबर लोकशाहीचे आणि आतला माल कुटुंबशाहीचा असावा असे ज्यांना वाटते ते बाळासाहेबांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात उभे राहतात आणि वेगवेगळे षडयंत्र करतात.
🔴 इथल्या प्रस्थापित मीडियातून झळकावून घेणारे जे आंबेडकरवादी म्हणवणारे विचारवंत, लेखक, कवी, कवियत्री वैगेरे वैगेरे आहेत प्रस्थापितांच्या उजव्या डाव्या मांड्यांवर बसलेले त्यांना माझा सवाल आहे की, वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त महाराष्ट्रात स्वायत्त राजकारण करणारा एक पक्ष आणि एक नेता दाखवा मी राजकारण सोडून घरी जाऊन बसतो.
🔴 काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणत आहेत की वंचितने आम्हाला पाठिंबा दिला. निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की, या लबाडांवर कारवाई करा. वंचितांची मोट बांधून, चटणी मिरची खाऊन आमचे कार्यकर्ते गावोगाव जाऊन प्रचार करत आहेत. स्वायत्त राजकारण उभ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी हे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करणार असाल, तर याद राखा बेट्ट्याहो वंचितच्या कार्यकर्त्यांशी तुमची गाठ आहे. बाळासाहेबांचा सैनिक तुम्हाला सोडणार नाही.
: सिद्धार्थ मोकळे
मुख्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी