Homeलेख*** *निसर्ग चक्र ****

*** *निसर्ग चक्र ****

*** *निसर्ग चक्र ****
धरती मातेने पोटात सामावून घ्यावे. विविध जातीचे बियाणे.
मातेने वंशाचा अंकुर पोटात रुजवावा. देखभाल करावी मातेच्या शरीराने

निसर्गातील ढगाने ओलेचिंब करावे. धरतीला प्रेमाच्या थेंबाने!
भूमातेच्या पोटातील बियाणे फुगावे. जोमाने जन्म घ्यावा अंकुराणे!

रोपट्याने बाह्य रूपाला बळी न पडता. वाढावे त्याग वृत्तीने.
वातावरणातील प्रदूषणाचा समतोल बिघडविला आहे. नेहमी सजीवाने.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेहमी दक्षता. घ्यावी लागते निसर्गाला पर्यायाने.
वाढत जावे नेहमी दिवसेंदिवस अंकुराने. वजन पेलावे हसत हसत वृक्षाच्या नेहमी बुध्याने.

जमिनीत खोलवर रुतून घ्यावं मुळांनी बिनधास्त डोलत राहावं वृक्षाने.
जमिनीतील पाणी मुळाने शोषूण द्यावे फांद्यानी नेहमी बिनधास्त वाढत राहावे आकाराने.

माता पित्याच्या अंगा खांद्यावर आनंदाने खेळत राहावे. तसे निसर्ग सृष्टीतील बाळ राजाने.
वृक्षानी फळा फुलांनी बहरतच राहावे. इतर सर्वांनी स्वाद घ्यावा आनंदाने ,

मातृ-पितरांच्या बोटाला घट्ट पकडून चालावे. तसे वृक्षाला घट्ट पकडून वरती चढावे वेलीनी.
वादळ,ऊन, वारा, पाऊसा पासून. आसरा घ्यावा रे नेहमी सर्व सजीवाने!
फळा फुलांचा सुगंधाचा मधाचा स्वाद घ्यावा पक्षी आणि मानवानी .

पिकलेली पाने गळतच राहाणारे.जन्म घ्यावा शेंढ्याच्या नवीन पालवीनी.
वयस्कर पिकलेली पाने गळतातच. नवीन फुटवा फुटण्याचे कार्य करावे. फुटव्यानी.

पाणी शोषून देण्याचे कार्य थांबवले मुळांनी की सुकून जावे वृद्धवृक्षाने.
मुळे बुंधा फांद्या अकार्यक्षम झाल्याने साथ सोडली सर्वांनी छाया सुखल्याने.

हे सर्व नैसर्गिक नियमावली तयार केली निसर्गातील सृष्टी माऊलीने.
वयोवृद्ध सुकून गेलेल्या वृक्षाच्या छायेखाली नाही कोणी थांबणार उत्स्फूर्त स्वखुशीने.

जिवणाची वाट चालतांना. निसर्गातील घडामोडींना पहावे विज्ञान दृष्टीने.
निसर्गात जितका चढ उतार आहे जीवन वाट चालताना पाय नेहमी जमिनीवर ठेवावे प्रत्येकाने.

बालपण तारुण्य पण म्हातारपण प्रत्येकाला आहे याची जाणीव ठेवावी प्रत्येकाने.
प्रत्येकानं एकमेकांना आसरा द्यावा निसर्गातील सावलीप्रमाणे.

आयु.देशमुख पी.आर.

9921111955

RELATED ARTICLES

Most Popular