Homeलेखसोयरीक एक गंभीर समस्या …

सोयरीक एक गंभीर समस्या …

सोयरीक एक गंभीर समस्या ………?
सोयरीक जमविणे पूर्वीच्या पद्धती………
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विवाह* * हा अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा क्षण मानला जातो. जन्माला आल्यानंतर आपलं बालपण असते. नंतर शिक्षणाला सुरुवात होते. शिक्षणानंतर नोकरी शासकीय निमशासकीय शैक्षणिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रात शिक्षणाच्या पात्रतेनुसार किंवा शैक्षणिक पात्रतेनुसार तश्याच काही शारीरिक पात्रता, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती घेऊन. पुर्वी नोकर्या मिळत होत्या. पूर्वी शिक्षणाचे प्रमाण ही फारच कमी होते. लोक शिकलेले जास्त नसल्यामुळे शिकलेल्यांना नोकऱ्या सहज मिळत होत्या.भरपूर प्रमाणात नोकर्या उपलब्ध होत होत्या.पण जास्त लोक शिकलेले मिळतं नव्हते. ज्यांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध क्षेत्रात नोकरीमिळत होती. . नोकरी मुलग्याला मिळाल्यानंतर किंवा मुलगा मोठा झाल्यावर प्रत्येक मुला मुलींचे आई वडील लग्न जमविण्यासाठी. विचार करत असत. स्थळ पाहण्यासाठी ज्या ठिकाणी स्थळांची माहिती मिळेल. त्या ठिकाणी पाहण्यासाठी फक्त वडीलधारी माणसं मिळून जात असायची. आणि मुलगी पसंत पडली तर मुला मुलींच्या आवडी निवडीच्या, किंवा पसंतींच्या विचार न करता.स्थळ पाहण्यासाठी गेलेल्या ठिकाणी लोकांचा पाहुणचार चांगला झाला की माणसं फार चांगली आहेत.असे समजून त्याच ठिकाणी मुलगी पसंत पडली आहे. असे तेथेच निर्णय सांगतं असतं.मुलग्यांने मुलगी पाहीलेली नसायची.आणि मुलगीने मुलगा पाहिलेला नसायचा.दोघांच्या पसंतीला स्थान दिले जात नव्हते.या पाठीमागे वडीलधारी जो निर्णय घेतील तो निर्णय स्विकारावा लागतं होता.वडीलधार्यांची आज्ञा पाळणे ही एक आदरयुक्त बंधन लादलं जात होते.त्यांच्या आदेशाचा स्विकार करावा लागत होता.तो आयुष्यभर पाळला जात होता.त्यावेळी कोणत्याही सुविधा, प्रसारमाध्यम, दळणवळणाच्या सुविधा, करमणूकीची साधनं, दवाखाने नव्हते. माणसं एकमेकांचा आदरयुक्त,आज्ञाधारक प्रामाणिक, वचनी होती. त्यावेळी एकत्रित कुटुंबपद्धती होती.कुटूंब प्रमुखाच्या आदेशानुसार वागात होती.प्रमुखांचा आदेश मोडता येत नव्हता.सांगतील ती कामं करून. मिळेल ते खाऊन.भरपूच काबाडकष्ट करत. संसाराचा गाडा आनंदाने ओढताना .कधीच कोणाच्या ही तोंडावरती नाराजी जाणवत नव्हती. दोन्हीकडच्या पसंती झाल्यानंतर मुलगीकडे साखरपुडा व्हायचा. आणि मुलाकडे घंटविळा व्हायचा.नंतर लग्नाच्या तारखा ठरवून लग्नाचा कार्यक्रम पार पाडला जात होता. पूर्वी लग्नाच्या पद्धती फार खर्चिक होत्या.कर्ज काढून सणवार,यात्रा, जत्रा, लग्न समारंभ, करावे लागायचे. आईवडीलांच्या लग्नांचे कर्ज मुलांना फेडायला लागतं होते.त्यावेळची मुलं दुसऱ्याच्या घरी चाकरमानी,घरगडी, राहून वडिलांचे कर्ज फेडत होती. *त्यावेळी लग्न पध्दती…,…..
एक दिवस हळद एक दिवस लग्न एक दिवस मदळास, एक दिवस रात्रभर बैल गाडीतून वरात काढली जात होती .अशा पद्धतीने त्या वेळेस लग्न दोन तीन दिवस चालत असायची.. त्यावेळी दळप कांडप करण्यासाठी गिरणी उपलब्ध नव्हत्या. भाऊबंधातील सर्व लोक एकत्रित येऊन सहकार्य करायचं आणि सर्वांनी एकत्रित येऊन गुण्या गोविंदानं कार्यक्रम पार पाडायचे. एकमेकांच्या एकजुटीने सहकार्यानेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नव्हत्या. कितीही एकमेकांत वाद विवाद असला तरी देखील विरोधक असले तरी लग्नसमारंभात आणि दुःखवट्यात ते सर्व विसरून पाठीमागे टाकून एकत्र लोक येत असायचे त्यावेळी लोकांच्या मध्ये एकजुटीचे आणि माणुसकीचे दर्शन दिसून येत होते. त्यामुळे कोणतेही एकमेकांवर प्रसंग आले संकट आली. तर सहजपणे सांभाळून नेली जात होती.पुर्वी मुलींचे शिक्षण फारसे झालेले नसायचे कारण त्यावेळी पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा समाजावरती असल्यामुळे मुलग्याला प्रथम प्राधान्य दिले जात होते. मुलगा हा वंशाचा दिवा समजून उतार वयामध्ये म्हातारपणी आपल्या आधाराची काठी होऊन आपला सांभाळ करणारं.म्हणून आयुष्याचा आधारस्तंभ समजून मुलग्याची जडण घडण आई-वडील काळजीपूर्वक करत होते.
मुलीला प्रत्येक आई वडील दुय्यम स्थान देत होते. मुलगी ही दुसऱ्याच्या घरचे धन आहे. किंवा दुसऱ्या घराची संपत्ती आहे. असे समजून तिला नेहमी घरचीच कामे, धुनी, भांडी सर्व घरकामे मोल मजुरी शिवाय लहान मुलांचे संगोपन इत्यादी कामातच मुलींना गुंतवून ठेवले जायचे. काही पालक मुलींना क्वचितच शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असत. मुलींच्या बाबत फारसं शिक्षणाला त्यावेळी महत्त्व दिले जात नव्हते. मुलं थोडीफार शिकलेली असायची.मुलींचे शिक्षण क्वचितच थोडंफार लिहायला वाचायला शिकलेल्या असायच्या.पुर्वी लग्न झाल्यानंतर जोडपी एक,दोन वर्ष एक हेका बरोबर बोलत नसायची.लग्ना नंतर,सोडपत्र, घटस्फोट,ब्रेकप, कोर्टात केशीस,असले कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नव्हत्या.जीवनात येणाऱ्या अडचणींना तोंड देत. शेवट क्षणा पर्यंत नैतिक जबाबदारी स्वीकारून पार पाडली जात होती.विवाहबंधन हे दोघांनी मिळून स्व इच्छेने स्विकालेली असते.ते शेवट पर्यंत निभावून नेण्यासाठी.दोघांनी ही एक नैतिक जबाबदारी स्वीकारून पार पाडली.पाहिजे.तरचं संसाराचा गाडा शेवट पर्यंत टिकतो.
सध्या प्रत्येक मुला मुलींचे आई-वडील स्वतःच्या मुलां मुलींना जास्तीत जास्त शिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. सर्वांची आर्थिक परिस्थिती उंचावलेली आहे. प्रत्येकाच्या घरी आज दोन चाकी, चार चाकी, गाड्या आहेत. प्रत्येकाचे राहणीमान सुधारले आहे. सर्व सोयीनियुक्त्त सुस्थितीत घरं, चांगल्या प्रमाणात राहणीमान आहे. बंगले, अद्ययावत इमारती, पक्की घरं बांधलेली दिसून येत आहेत. प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं की माझी मुलगी भरपूर शिकलेली आहे. तिला उत्तम प्रकारचं चांगले स्थळ मिळायला पाहिजेत.तिला कोणत्याही सुविधा कमी पडता कामा नये.
शारिरीक श्रम किंवा काबाडकष्ट नको. प्रत्येकांच्या अपेक्षा जास्त उंचावलेल्या दिसून येतात. सरकारी नोकरवालाच पाहिजेत. डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, उच्च पदस्थ असलेला. भरपूर पगार मिळविणारा भरपूर उत्पन्नदार, देखणा, गोरा, गोमटा, पाहिजे. आणि त्यातल्या त्यात एकुलता एक मुलगा असेल तर अधिक प्राधान्य. अशा अनेक प्रकारच्या इच्छा अकांक्षा भरपूर प्रमाणात दिसून येतात.
आज प्रत्येक आई-वडिलांच्या बरोबरच मुलींच्या देखील अपेक्षा, आवडी निवडी वाढलेल्या दिसतात.प्रत्येकजंन गरजेपेक्षा जास्त अपेक्षेच्या ओझ्याखाली दबला जात आहे.

आपण 21व्या शतकात म्हणजेच विज्ञान युगात शास्त्रज्ञांनी‌ अहोरात्र प्रयत्न करून विविध प्रकारचे संशोधन केले आहेत. त्यामुळे आज आपल्याला अनेक वैज्ञानिक, भौतिक,वाजवीपेक्षा जास्त सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.त्यामुळे माणसं आळशी,झालेली आहेत.
त्या सुविधांचा योग्य वापर जीवनात होण्या ऐवजी सध्याची पिढी गरजे पेक्षा जास्त दुरुपयोग करीत असलेली दिसून येते. उदाहरणार्थ इंटरनेट, टीव्ही मोबाईल, असे विविध प्रसार माध्यमांच्यामुळे माणूस श्रमजिवीके पासून बाजूला फेकला जात आहे .
प्रत्येकाला श्रमाविना भौतिकसुख सुविधांचा लाभ घेण्यासाठी. आत्ताची पिढी आतुरलेली दिसते. येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता दिसून येत नाही.येणार्या प्रसंगांना सामोरे जाण्याची दोघांची ही तयारी नसल्याने.अडचणी निर्माण होत आहेत.
आपण विवाह बंधनाची गाठ मारताना.
सर्व गोष्टी पाहून एकमेकांच्या पसंतीने विवाह ठरवून. केलेली लग्न असून देखील. ती सहा महिन्यात किंवा वर्षात घटस्फोटासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढतायेत. यामागे नेमकी काय कारण असू शकतात. या अत्यंत चिंताजनक बाबी आहेत. ज्यांच्याकडे संसार टिकवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्या म्हणजे एकमेकाला समजावून घेऊन तडजोड करणे होय. आणि ज्यांना तडजोड करणे जमत नाही. म्हणून अर्धवट विचाराने तडका फडकी. उतावळ्या मनाने निर्णय घेण्याच्या सवयीमुळे. त्यांचे संसार दीर्घकाळ टिकणे अशक्य होत आहेत. संसार आपण टिकवू शकलो नाही. तर दोन्ही कडच्चा अडचणीत वाढ होऊन.दोन्ही कुटूंब पूर्णपणे आपण उध्वस्त करतो आहोत. आणि जन्म दिलेल्या मुलाबाळांच्या आयुष्याचे ही जीवन उध्वस्त करायला सर्वस्वी आपणच जबाबदार ठरणार आहोत. याचा पावलो पावली विचार करण्याची गरज आहे . सर्वच गोष्टी बाजारामध्ये पैशाने खरेदी करता येत नसतात. तर त्या आपण स्वतःच्या हिमतीने मिळवायला लागतात.आयुष्यात काही कमवायचे असेल तर काही गमवाव्या ही लागतात. गमावल्याशिवाय कमवता येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. तर प्रथम त्याग करायला शिका तरच त्या त्यागाची फळ तुम्हाला आनंदाने उपभोगता येतील.कष्टाशिवाय या जगात काहीही मिळत नाही. पूर्वीची पिढी येणाऱ्या संकटाला, प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जायची म्हणून त्यांचे संसार आनंदाने भरलेले फुललेले दिसायचे.त्यांच्याकडे जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची क्षमता, हिम्मत, जिद्द ,होती. आताच्या पिढीकडे सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्याने कोणतेही श्रम, परिश्रम, काबाडकष्ट नको. आळस, अज्ञान, अंधश्रद्धा,हे खरे मानवाचे शत्रू आहेत.जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर यांच्या पासून नेहमी सावध राहिले पाहिजे. सुख म्हणजे नेमकं काय असतं. याची व्याख्या आताच्या पिढीला समजलेली नाही. सुखाची व्याख्या प्रथम समजावून घेणे गरजेचे आहे. याचा परिपूर्ण विचार करत नसल्याने त्याचा प्रत्येकाच्या जीवनावर, आरोग्यावर मानसिक, शारीरिक , परिणाम उद्भभवत आहेत.आयुष्यात उद्भवणाऱ्या प्रसंगांना हसतमुखाने मुकाबला केला तरच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होऊ शकता. पूर्वीची पिढी कमी शिकलेली असून देखील. ती मान मर्यादा ओलांडत नव्हती.एकमेकां आदर राखून वागत होती. आताची पिढी भरपूर शिकलेली आहे. सुशिक्षित आहेत. उच्च पदव्या संपादन केलेल्या यांच्याकडे आहेत. पण अनुभवाच्या शिदोरीची कमतरता यांच्याकडे नेहमी जाणवते. जी व्यक्ती संकटाच्या अनुभवाच्या भट्टीतून जात असते. तीच जीवनात परिपूर्ण यशस्वी होत असते. अनुभवातूनच खऱ्या ज्ञानाचा जन्म होतो म्हणतात ते खरंच आहे..
सुशिक्षित ही व्यक्ती परिपूर्ण आहे असे आपण म्हणतो.माझी व्याख्या वेगळी आहे.ज्याला लिहायला वाचायला येत नाही तो निरिक्षर,ज्याला लिहायला, वाचायला येत तो साक्षर,जी व्यक्ती जीवनातील सत्य आणि असत्य शोधतोय आहे तोच खरा साक्षर. ज्यांच्या कडून सुशिक्षित गुणांची अपेक्षा करीतआहे. त्यांच्या कडून ते दिसून येत नाहीत. म्हणूनच संसारामध्ये किरकोळ कारणावरून खटके उडतायेत घर उद्ध्वस्त होऊन, कुटूंब संस्था ऊध्वस्त होत आहेत.सध्या कोर्ट कचऱ्यामध्ये कौटुंबिक तक्रारीच्या केसेस वाढतायेत आणि याचा सर्व फायदा कोर्टातल्या वकिलांना होतंय. आपण मात्र आपलं आयुष्याचा रस्त्यावर बाजार मांडून जीवन उध्वस्त करण्यातचं आंनद मानत आहोत. यांचा सुरक्षित म्हणून विचार करणारं आहात का नाही ॽआपला संसार आपणच अर्धवट विचाराने आग लावून त्याची राख रांगोळी करत असेल! तर ती आग विझवणार कोण.? म्हणून सर्व बाजूने याचा आपण आताच्या पिढीला शांत पणाने विचार करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाच्या जीवनात एक धागा सुखाचा, शंभर धाग्ये दुखांचे
आपण सर्वजण सुज्ञ आहात.अपेक्षा असणं काही चुकीचे नाही.
सध्या 2010 सालापासून शासनाने कोणत्याही प्रकारच्या शासकीय नोकर भरतीच केलेल्या नाहीत.तर नोकरीवाली मुलं मिळणार तरी कोठून? शासकीय नोकरीत असलेली मुलं दुर्मिळ आहेत.वयोमानाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासन सर्वत्र शासकीय नोकऱ्या कमी करून कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणि कमी पगारात राबवून घेण्यासाठी खाजगीकरणाचा सपाटाच चालू केल्यामुळे मुलांच्या समोर नोकरी मिळविणं महाकठीण झाले आहे. शेती व्यवसाय उद्योगधंदे, करणाऱ्या मुलांना सध्याचे आई-वडील किंवा मुली पसंत करायला तयार नाहीत. प्रत्येक आई-वडिलांना वाटतं या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी किमान चांगले स्थळ मिळेलं. अशी वर्षा मागून वर्षे चाललेली आहेत. लग्न कांहीं जुळत नाहीत.वय काय कोणासाठी थांबत नाहीत. त्यामुळे मुला मुलींची वयमान दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. आज सर्व साधारण 35 ते 40 वर्षे वयातील मुलांची मुलांचीही लग्न अद्याप झालेली नाहीत.त्यांच्या वयमानानुसार त्यांच्या जीवनातील पुढील भावी पिढीवर देखील याचे दुश्यपरिणाम होणार आहेत. मुला मुलींच्या मनावर ताण तणाव वाढत जाऊन त्यांना विविध प्रसंगाना सामोरे जावे लागत आहेत. या सर्व बाबींचा विचार सध्याचे आई-वडील करायला तयार नाहीत. सरकारी नोकरी नाही. म्हणून आयुष्यभर बिन लग्नाचं मुला मुलींनी राहायचे का ॽ हा खरा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि मुला मुलींच्या वरती आई-वडिलांची नैतिकतेचे दडपण असल्याने.त्यांची चहुबाजूने कुचंबणा होत आहे. मुलगा दिसायला चांगला असेल तर त्याची परिस्थिती चांगली नसते. परिस्थिती चांगली असेल मुलगा दिसायला चांगला नसतो. दोन्ही गोष्टी असतील तर सरकारी नोकरी नाही. नोकरी वाला.असेल तर घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अशा अनेक कारणामुळे लग्न जमायला तयार नाहीत. मुलगा पसंत पडला तर त्याच्या घरच्या नातेवाईकांच्या अपेक्षा भरपूर असतात. आणि त्या जर पुर्ण होत नसतील. तरी लग्न जमत नाहीत. इकडे आड तिकडे विहीर म्हणायची वेळ आली आहे.आजकाल परिस्थिती फार बिकट होत चालली आहे.लग्न जमवितांना घरातील मुख्य व्यक्तीनीच! निर्णय घ्यावा.असे माझे व्यक्तिगत मत आहे.सर्व नातेवाइकांचे सल्ले घेऊ नये.कारणं प्रत्येकांची मतभिन्नता वेगवेगळ्या आढळतात, निर्णय घेण्याची क्षमता सर्वांच्या कडे असते असे नाही.सर्वांचे एक मतं कधीच होतं नाहीत.त्यामुळे चांगली स्थळ जमत असलेली. ही काही लोकांच्या चुकीच्या मतामुळे स्थळ मोडत असतात. तेंव्हा याचा गांभीर्याने कुठेतरी विचार करायला पाहिजे. असं मला वाटते. स्थळ पाहताना प्रामुख्याने पुढील गोष्टींचा विचार करावा. मुलग्याची, मुलगीची पसंतीनुसार पुढील गोष्टींचा विचार करून. आई-वडिलांनीच ठामपणे निर्णय घेतला पाहिजे. मुलगा पाहताना तो प्रयत्नवादी, कर्तबगारी आहे की नाही त्याचा स्वभाव, निर्व्यसनी, निरोगी, सदृढ आहे का. या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. शेवटी जीवनामध्ये तडजोड केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. जीवनामध्ये किंवा आयुष्यात येईल त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची मानसिकता असणे.आपल्यामध्ये फार गरजेचे आहे. श्रमाशिवाय या जगात आपल्याला काहीच मिळत नसते. आपल्या आई-वडिलांनी भरपूर कष्ट केलेले असतात. म्हणून आपणास हे वैभव प्राप्त झालेले असते.हे विसरून चालणार नाही.एक पिढी काबाडकष्ट करून मिळवते. दुसरी पिढी आळशी होऊन घालविते. याची जाणीव नेहमी आताच्या पिढीने ठेवावी. जीवनात काबाड कष्ट करण्यास कधीही लाज बाळगू नका. वाईट कृत्य करायला लाज बाळगा. वाईट कृत्य करणे फार सोप असतं. पण चांगलं कृत्य करणे फार कठीण असतं.हे नेहमी आपण लक्षात ठेवा.
जनावरांच्या बाजारात जनावरांची खरेदीसाठी.दलाला शिवाय खरेदीचे व्यवहार होत नाहीत.आता ती पध्दत विवाह जमविण्यात ही चालू झालेली आहे.स्थळ दाखवणे जमविणे.जमले तर दोन्ही पार्टीकडून ठरलेल्या ठराविक रक्कम सह दोन्ही पार्टीकडून कपडे वसूल केली जातात. काही लोकांनी जोडधंदा व्यवसाय म्हणून हा धंदा चालू केला आहे.ऑन लाईन वरून देखील सर्व सामान्य जनतेची घोर फसवणूक होऊन (लबाडणूख ), होत आहे. तेव्हा सर्वसामान्य पालकांनी या गोष्टींना बळी न पडता सावध राहणे काळाची गरज आहे.
संसार तोड्नं फार सोपं आहे.पण ठिकवनं फार कठीण आहे.
भावबंधन नाटकात राम गणेश गडकर्‍यांनी म्हटलेले आहे. की गरजवंताला अक्कल नसते आणि लाज ही नसते. तीच अवस्था प्रत्येक गरजवंताची झालेली आहे.
दोन्हीकडच्या मंडळींनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे.विवाह जमविणं, आणि विवाह करणे.फार सोपं आहे.शेवट पर्यंत टिकवणे महाकठीण झाले आहे. याचा आपण सर्वांनी कुठे तरी गांभीर्याने विचार करावा.आपले विवाह बंधन कायम टिकवून ते शेवटपर्यंत विवाह बंधन ठिकावे म्हणून एक छोटासा प्रयत्न वेड्यां प्रमाने करीत आहे. याचा सर्वांनी विचार करावा.अशी ही नम्र विनंती आहे.🙏🙏

जय भीम नमो बुद्धाय👏👏

देशमुख पी आर.
मुक्काम चिंचणे .
तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर

RELATED ARTICLES

Most Popular