- 🔥 लोकशाहीची थट्टा 🔥
राज्यकर्त्यांनी परंपरा चालवली आहे घराणेशाहीची!
सत्तेच्या स्वार्थापोटी पायमल्ली केली आहे लोकशाहीची!!
घराणेशाहीचा यांनी तर वारसा हक्कच नोंदवला!
कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ताधारी सत्ताधीश झाला !!
विकासाच्या नावाखाली शासकीय निधी तालुक्यांत आणलाय!
मर्जीतील ठेकेदारांनाच शासकीय कंत्राट देऊ लागलाय!!
जन सेवेच्या नावाखाली तिजोरीवर मारला डल्ला!
अवघ्या पाच वर्षांतच कमिशनवर करोडोपती झाला.!!
कार्यकर्ता मात्र आयुष्यभर सतरंज्या, खुर्च्या, उचलत राहिला!
आशेपायी यांच्यासाठी कायमचाच कंगाल होऊन बसला!!
सर्वत्र खाजगी करणांचा यांनी सपाटाच लावला!
सुशिक्षित तरुणाईचा शासकिय नोकरीत कणाचं मोडला!!
निवडणुकीच्या वेळी हात जोडून गल्ली बोळात मतांचा जोगवा मागतात!
विजयी झाल्यानंतर सर्व सामान्यांच्या घरावर नांगर फिरवतात!!
निवडणुकीच्या वेळी एकमेकांच्या विरोधी पक्षात लढतात.
विजयानंतर सत्तेच्या खुर्ची साठी सत्ताधारी पक्षात जातात!!
निवडणुकीच्या वेळी मंगळसूत्र एका पक्षाचे वापरतात!
नांदायला मात्र सत्तेसाठी दुसऱ्या पक्षाच्या घरात जातात!!
हे राजकारणी दिवसा ढवळ्या लोकशाहीची हत्या करतात!
निष्ठावंत मतदारांचा विश्वासाने गळाच कापतात!!
स्वत:चा भ्रष्टाचार लपविण्यासाठी विकासाचे गाजर दाखवतात !
शासकीय यंत्रणा हाताशी धरून यांचा सर्वच भ्रष्टाचार लपवितात!!
गाढव, कुत्र्यांची विक्री होते तीस ते चाळीस हजाराला!
आईला साडी, बापाला बाटली,
मुलांना पार्टी, देऊन लाचार करतात मतदाराला!!
मतदारही लाचार होतो आहे यांच्या तुकड्याला!
लोकशाहीची हत्या करुन जातात सत्तेच्या वळचणीला !!
गुंड प्रवृती लागली आई बहिणींची इज्जत लुटायला!
सत्ताधारी लागलेत लाडक्या बहिणींचं गुणगान गायला!!
सत्तेसाठी गोडवे गातोय. लोकशाहीचे!
दिवसा मात्र तुकडे करतोय संविधानाचे!!
सत्ता संपत्तीचा माज आला या सत्ताधार्याना !
उध्वस्त करतो गरीब झोपडपट्टी वाल्यांना !!
सर्व क्षेत्रांतील शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने गंजली !
सामान्य जनतेची स्वप्ने यांनी जिवंत पणीच मातीत गाडली!!
नाही राहिला सामान्य जनतेचा आता वाली कोणी!
मनुवादी व्यवस्थेच्या हातात सत्ता दिली बहुजन गद्दारांनी!!
लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणीं सत्तेसाठी यांना आठवल्या!
भोळ्या भाबड्या बहिणीनी रक्षणाच्या राख्या हातात बांधल्या!!
नराधमांच्या अत्याचारांमुळे सध्या बहिणी सुरक्षित नाही राहिल्या!
वेदनांच्या किंकाळ्या अन् वेदना यांच्या कानावर नाही आल्या!!
निवडणुकीत सर्व जाती धर्माच्या मतांवर निवडून येतात!
नंतर मनुवादी व्यवस्थेचे गद्दार होऊन बसतात!!
सत्तेची नशा चढली की बहुजनांना खाकी वर्दीत अडकवितात !
बहुजनांची मुलं यांच्यासाठी कस्टडीत कैद होऊन बसतात!!
सर्व सामान्यांना जाती धर्माच्या पिंजऱ्यात कैद करतात!
चारित्र्य पडताळणीमुळे तरुण नोकरीला कायमची मुकतात!!
सत्ताधाऱ्यांना सत्तेच्या परीक्षेला नाही कोणत्याही अटी !
संपत्तीच्या बळाच्या जोरावर सत्ता हस्तगत करण्याच्याचं अटी!!
बहुजनांनी मनुवादी व्यवस्थेच्या हातात दिली सत्ता!
राष्ट्रीय देशभक्तांच्या विचारांचा कापला त्यांनी पत्ता!!
विकासाच्या नावाखाली दाखवतात क्षणोक्षणी वेगवेगळ्या वाटा!
शासकीय तिजोरी लुटायला शोधतात क्षणोक्षणी अनेक पळवाटा!!
निवडणुकीच्या वेळी खोट्या आश्वासनांचा पाडतात पाऊस!
मतदारांना लाचार करण्यासाठी शासकीय तिजोरीतून पाडतात पाऊस!!
सर्व सामान्य जनता यांच्या भुलथापांना भुलतात!
खादीच्या स्वच्छ कपड्यांच्या आत सर्वच लपवितात!!
मतदारांना भुलविण्यासाठी एक दिवस पाजतात दारु मटणाचा रस्सा!
विजयानंतर सत्तेची चावी दिली की नंतर पाच वर्षे बोंबलत बसा !!
सर्व सामान्य जनता होते कायमचीच भकास !
व्यक्तिगत होतो सत्ताधारी यांचाचं विकास!!
परिवर्तनवादी विचारांना विचारानेच उत्तर देण्याची आहे लोकशाही!
विचारांनी ऊतर देण्या ऐवजी गुंडगिरीने ऊतर देणं ही कोणती लोकशाही!!
सत्ताधारी गुंडप्रवृतीला आसरा देऊन पोसताहेत!
समाजप्रबोधन करणारी माणसं यांच्या शस्त्राने राजरोसपणे मारताहेत!!
निवडणुकीच्या वेळी ताईत गंडेदोरे कर्मकांड मंत्राचा पडतो पाऊस!
प्रचार आणि मतदान कशाला EVM
मशिन ठेवा ढोंगी बाबांच्या जवळपास!!
दैनंदिन जीवनात उपभोग घेतात विज्ञानांचा!
वेळ प्रसंगी गुडघे टेकून आधार घेतात कर्मकांडांचा !!
सत्ताधारी मात्र एखाद्या पक्षांबरोबर गरजेपुरता प्रपंचा करतात!
पत्नीने मात्र यांचे सर्व गुणदोष विसरून आयुष्यभर संसाराची अपेक्षा करतात!!
सत्ता ही पाण्याच्या प्रवाहासारखी नेहमी वाहत राहिली!
तरचं आपली सत्ता घरणेशाही जंतुच्या दुर्गंधी पासून वाचवली !!
मनुवादी व्यवस्थेची नाचत ठुमकत सत्तेची आली रखेली!
सर्व बहुजनांना अंधश्रद्धेच्या नजरेने कर्मकांडात गाढली !!
घटनेचा चौथा आधार स्तंभ असलेले प्रसार माध्यमे लाचार झाली!
सर्व सामान्य जनता न्याय हक्काला मुकली!!
अन्यायाच्या अंधकारात जनता आहे कायमची दु:खी!
सत्ताधार्यांच्या दडपणाखाली अडकली आहे कायदा सुव्यवस्थेची खाकी!!
सत्तेचा दुरुपयोग घराणेशाहीसाठी जे करतात गद्दार!
मतदारांनो एका बोटाच्या सामर्थ्याने सत्तेतून करा त्यांना हद्दपार!!
!
🙏🙏🙏🙏🙏
देशमुख पी आर.
9921111955