HomeलेखTo Be Or Not To Be That Is The?

To Be Or Not To Be That Is The?

To Be Or Not To Be That Is The?

कधी कधी वाटत कि मी पुन्हा एकदा माणूस जन्माला येईल का जे मी या जन्मात नाही करू शकलो ते करेल का?

मी एक चांगला मुलगा चांगला पती चांगला बाप होईल का कारण हे जे सर्व जे मी होऊ शकलो का नाही हे अजून पर्यंत कळालच नाही
आयुष्यात खूप वळण आले पण आता मात्र जे रस्ते परत नाही जात अस्या रस्त्यावर खूप लांब मी आलो असे वाटत आहे मानून आता कधी कधी असा विचार यतो कि मला परत एक आयुष्य भेटेल का झालेल्या चुका मी भरून काढेल का?

कधी कधी वाटत कि आपण इतर किड्या मुंग्या सारखं माणसाच्या जन्माला आलो आणि काही न करता मरून गेलो असं होईल का कारण आता मला कुटच मी काय करू शकेल असं वाटत नाही असं का वाटत नाही मलाच कळत नाही..

मी माझ्या सर्व बाजूला पाहिलं जिकडं पाहावं तिकडे अंधार दिसतो मानून वाटत कधी कधी या अंधारात प्रकाश होऊन कोण येईल का…
आपली व्यथा सांगावी तर कुणाला सांगावी हा एक मोठा प्रश्न मला खूपच जास्त सातवतो मानून वाटत का आता या आयुष्याला पूर्ण विराम द्यावा…का?

कधी कधी वाटत एकीकडे खूप मोठा असा कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे आपली बेरोजगारी या डोंगराच्या आत अडकलेला मी परत मला स्वतःला सापडेल का…..?

कधी कधी वाटत आपण केलेल्या चुका आपली बेरोजगारी आपला कर्जाचा डोंगर मी माझ्या मुलांना विरसात मध्ये देऊन निघून तर नाही जाणार म्हणून परत आयुष्याच्या पूर्ण विराम चा विचार दूर जातो…
.
कधी कधी वाटतं आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं त्यांची परिस्थिती नसताना पण आपल्या नालायक पना मुळे आपण बेरोजगार राहिलो पण मी माझ्या मुलांना कमीत कमी चांगल्या शाळेत शिकवेल का….

कधी कधी वाटत कि सर्वच सुशिक्षित बेरोजगार लोकांची हाल आपल्या सारखेच असतील मग सर्वच असा विचार करत असतील का…?

                                         Rajan Tele
RELATED ARTICLES

Most Popular