शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद, निफ्टी-सेन्सेक्स-निफ्टी बँक 2% घसरणीसह बंद Stocks in upper circuit : इराण आणि इस्रायल संघर्षाची भारतीय शेअर नुकसान पोचले .शेअर मार्केट जवळपास 1800 अंकांनी घसरला. यामध्ये गुंतवणूकदारांचे 10 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झालं. महिन्याभरात कमावलेला नफा बाजारातील एका सत्रात संपला आहे. सेन्सेक्स पॅकमध्ये सर्वात मोठी घसरण एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो, मारुती, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, ॲक्सिस बँक आणि टाटा मोटर्समध्ये दिसून आली. अशा परिस्थितीतही काही शेअर्सने जोरदार कामगिरी केली आहे. या शेअर्समध्ये २० टक्के अप्पर सर्किट लागला. इस्रायल आणि इराणमधील वाढत्या युद्धाच्या भीतीमुळे शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार विक्री दिसून आली. आज निफ्टी जवळपास 550 अंकांनी कमी होऊन 25250.10 इतका बंद झाला आहे.