Homeसामाजिकको. दौ. विद्यालयात संविधान दिनानिमित्य निबंध स्पर्धा

को. दौ. विद्यालयात संविधान दिनानिमित्य निबंध स्पर्धा

को. दौ. विद्यालयात संविधान दिनानिमित्य निबंध स्पर्धा

सिद्धार्थ कदम

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

पुसद येथील को.दौ.विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान मधील अंतर्भूत काही विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
ह्या निबंध स्पर्धेत वर्ग पाच ते सातच्या 641 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. भारतीय संविधानाबद्दल विशेष माहिती व महत्व तथा नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये,ह्यांविषयी विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण निबंध लेखन केले.
या निबंध स्पर्धेचे प्रभारी म्हणून सौ.राधिका देशमुख मॅडम,श्री.सुनिल बेले सर, शारीरिक शिक्षण शिक्षक सुधिर राठोड व विक्रम पाटील सर ह्यांनी कार्य केले.तसेच पूर्व माध्यमिक विभागातील शिक्षक -शिक्षिका व शिक्षेकत्तर कर्मचारी वृंद ह्यांनी सहकार्य केले.
या निबंध स्पर्धेसाठी मुख्याध्यापक श्री.वायकुळे सर उपमुख्याध्यापिका सौ.रिता बघेल मॅडम पर्यवेक्षक श्री.जाधव सर व श्री.मुराडी सर ह्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विशेष उल्लेखनीय निबंध लिहिणाऱ्या विदयार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular