Homeसामाजिकग्रामीण रुग्णालय थाळनेर मार्फत जागतिक एड्स दिन 2024 व पंधरवडा निमित्त स्वामी...

ग्रामीण रुग्णालय थाळनेर मार्फत जागतिक एड्स दिन 2024 व पंधरवडा निमित्त स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय दहिवद यांच्या संयुक्त विद्यमाने जण जागृती पर कार्यक्रम संपन्न

धुळे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश (सागर भाऊ) मोहिते….

ग्रामीण रुग्णालय थाळनेर मार्फत जागतिक एड्स दिन 2024 व पंधरवडा निमित्त स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय दहिवद यांच्या संयुक्त विद्यमाने जण जागृती पर कार्यक्रम संपन्न
आज दिनांक 10/12/2024 रोजी म. शितल पाटील मॅडम सो जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या सुचने नुसार व ग्रामीण रुग्णालय थाळनेर वैद्यकीय अधिक्षक डॉ गुलाबराव पाटील यांच्या नियोजना खालीआज रोजी आय सी टी सी थाळनेर मार्फत जागतिक एड्स दिवस व पंधरवडा निमित्त
स्वामी विवेकांनंद कनिष्ठ महाविदयालय दहिवद यांच्या संयुक्त विदयमाने कार्यक्रम घेण्यात आला यात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री ए एस मराठे सर व उद्घाटक उपप्राचार्य होते. व प्रमुख मार्गदर्शक श्री अमोल पाटील समुपदेशक व श्री रवींद्र महिरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आयसीटीसी विभाग थाळनेर हे होते त्यात सर्वप्रथम सूत्रसंचालन प्राचार्य श्री ए एस मराठे सर यांनी केले जागतिक एड्स दिन विषयी माहितीपर मार्गदर्शन केले नंतर श्री अमोल पाटील समुपदेशक यांनी जागतिक एड्स दिन 2024 चे ब्रीदवाक्य पासून सुरुवात करत एच आय व्ही कसा होतो पसरण्याचे मार्ग लक्षण औषधोपचार याविषयी सकल मार्गदर्शन केले त्यानंतर श्री रवींद्र महिरे यांनी रक्त तपासणी विषयी व १०९७ टोल फ्री क्रमांक याविषयी मार्गदर्शन केले तसेच रॅली काढण्यात आली व पोस्टर प्रदर्शन व IEC वाटप करण्यात आले.
सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्था धुळे येथील श्रीमती मीना भोसले यांच्या नियोजनाखाली लिंक वर्कर निखिल बिराडे व श्री लोटन करणकाळ यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली व आभार प्रदर्शन प्राचार्य श्री ए एस मराठे सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.
यात सप्तशृंगी महिला बहुउद्देशीय संस्थेचे निखिल बिऱ्हाडे व लोटण करणकाळ यांचे कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular