धुळे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश मोहिते
जागतिक एड्स पंधरवडा निमित्त आय सी टी सी थाळनेर व दहिवद महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विदयमाने ड्राइवर व क्लिनर यांच्यासाठी झाला जागृती कार्यक्रम
दि 12 रोजी म. शितल पाटील मॅडम सो जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या सुचने नुसार व ग्रामीण रुग्णालय थाळनेर वैद्यकीय अधिक्षक डॉ गुलाबराव पाटील यांच्या नियोजना खाली आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय थाळनेर मार्फत जागतिक एड्स पंधरवडा निमित्त महामार्ग पोलीस दहिवद यांच्या संयुक्त विदयमाने ड्राइवर व क्लिनर
जण जागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यात पी एस आय मुस्तफा मिर्झा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व श्री अमोल पाटील समुपदेशक यांनी एच आय व्ही कसा होतो पसरण्याचे मार्ग लक्षण औषधोपचार याविषयी सकल मार्गदर्शन केले त्यानंतर श्री रवींद्र महिरे यांनी रक्त तपासणी विषयी व १०९७ टोल फ्री क्रमांक याविषयी मार्गदर्शन केले तसेच पोस्टर प्रदर्शन व IEC वाटप निरोध वाटप करण्यात आले.
सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्था धुळे येथील श्रीमती मीना भोसले यांच्या नियोजनाखाली लिंक वर्कर निखिल बिराडे व श्री लोटन करणकाळ यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.तसेच कार्यक्रमात पोलिस कर्मचारी पोहेकॉ. संजय जाधव ,पोहेकॉ.संदिप कदम,
पोकॉ .संदिप गवळी पोकॉ.अरविंद वाघ पोकॉ.तुषार बाविस्कर.कार्यक्रमात उपस्थित असून सहकार्य लाभले.