धुळे जिल्हा प्रतिनिधी समाधान बैसाणे
धुळे महानगर पालिका शाळा मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांची स्किल ट्री कडून सुरक्षा आणि सुरक्षितता बाबत प्रशिक्षण शिबिर.
दिनांक 13/12/2024 रोजी धुळे महानगर पालिका शाळा मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांची स्किल ट्री कडून सुरक्षा आणि सुरक्षितता बाबत प्रशिक्षण शिबिर
घेण्यात आले त्यासाठी श्री विषंभर दासरवाडकर साहेब (मुख्य प्रशासन अधिकारी म न पा धुळे) श्री इलियास पठाण साहेब (ऊप प्रशासन अधिकारी म न पा धुळे) श्री जी इ सूर्यवंशी सर तसेच स्किल ट्री चे अमरावती व धुळे चे विभाग प्रमुख श्री अजित धसाडे सर धुळे जिल्हा समन्वयक श्री विजय नंदन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण घेण्यात आले.
मुख्य प्रशिक्षक श्री योगेश पाटील सर श्री जितेंद्र शिरसाठ सर हे उपस्थित होते.
शिबिरात विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता यावर प्रशिक्षण देण्यात आले.श्री दासरवाडकर साहेब यांच्याकडून स्किल ट्री चे व उपस्थित टीम चे विशेष कौतुक करण्यात आले.