Homeसामाजिकनाशिक विभाग धुळे जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा निकुंभे येथे सहायक संचालक...

नाशिक विभाग धुळे जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा निकुंभे येथे सहायक संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची भेट…

धुळे जिल्हा प्रतिनिधी समाधान बैसाणे

नाशिक विभाग धुळे जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद शाळा निकुंभे येथे सहायक संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची भेट….

संगणक व डिजिटल साक्षरते मुळे होतोय प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास…

धुळे – समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील 2273 शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक शिक्षक (Computer Instructor) सुद्धा रुजू करण्यात आलेले आहे,तांत्रिक शिक्षणाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही त्यात संगणक महत्वाची भूमिका बजावित आहे.संगणकाच्या साहाय्याने विद्यार्थ्याची स्वयं अध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते,तसेच क्रमांन्वित अध्ययन पद्धतीचा वापर करता येतो. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ,राज्य प्रकल्प संचालक श्रीमती आर विमला मॅडम यांनी आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे. यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यातील 61 शाळेमध्ये हा उपक्रम चालू असून, अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती आर विमला यांच्या सूचनेप्रमाणे व तसेच शिक्षण अधिकार धुळे जिल्हा श्रीमती किरण कुवर मॅडम, श्री गेंदीलाल साळुंखे (विस्तार अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा समन्वयक विजय नंदन यांच्या सहकाऱ्याने कार्यक्रम राबवण्यात आला..

जिल्हा परिषद शाळा निकुंभे येथे एमपीएसपी सहा.जिल्हा संचालकांची भेट व मार्गदर्शन…

जिल्हा परिषद शाळा निकुंभे येथे सहाय्यक संचालक कार्यक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद मुंबई सरोज जगताप व पुष्पावती पाटील निरंतर शिक्षणाधिकारी धुळे तसेच अनिल शिंदे कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.श्रीमती सरोज जगताप याना आयसीटी लैब बद्दल जितेंद्र शिरसाठ आयसीटी इंस्ट्रक्टर यांनी अधिक माहिती दिली.सरोज जगताप यांनी स्किल ट्री कन्सल्टिंग व जितेंद्र शिरसाठ आयसीटी इंस्ट्रक्टर याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

RELATED ARTICLES

Most Popular