
पन्हाळा : पोहाळे तर्फ बोरगाव (ता.पन्हाळा) येथील श्रमिक वाचनालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्यावतीने शासनमान्य वाचनालयांसाठी कृती कार्यक्रम दिला होता.त्यानुसार श्रमिक वाचनालयात विद्या मंदिर पोहाळे तर्फ बोरगाव प्राथमिक शाळेच्या सहकार्याने वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली.वाचनालयाचे अध्यक्ष जयसिंगराव माळवी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.ते म्हणाले,”विद्यार्थ्यांनी विरामचिन्हे लक्षात घेऊन आरोह- अवरोहांसह वाचन केले पाहिजे.” यावेळी श्री. माळवी यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे आदर्श वाचन करून दाखवले.त्यांनतर ‘सामुहिक वाचन’ हा उपक्रम संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके देऊन सामूहिक वाचन घेण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.याच दिवशी वाचन संवादही झाला.
गत सप्ताहात ग्रंथप्रदर्शन पार पडले. प्रदर्शनात वाचनालयातील निवडक 500 पुस्तके प्रदर्शित करण्यात आली.बालसाहित्य,बालकविता,एकांकिका,कथासंग्रह याशिवाय गाजलेली मराठी,हिंदी,इंग्रजी पुस्तके प्रदर्शित केली.विद्यार्थी,शिक्षक व पालकांनी पुस्तके हाताळली.बहुतेकांनी वाचनालयातच वाचनाचा आनंद घेतला.याशिवाय पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण सादर केले.तसेच वाचलेल्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना विषद केली.
वाचनालयाच्या विनावर्गणी मोफत बाल वाचनालयाकरिता विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर व तंत्र सहाय्यक उत्तम कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाचे अध्यक्ष जयसिंगराव माळवी,उपाध्यक्ष आनंदा जाधव,विश्वास माळवी,दगडू माळवी,हंबीरराव पाटील,संदीप माळवी,सतीश माळवी,बबन माळवी,संदीप खवळे आदींनी संयोजन केले. मुख्याध्यापक मारुती खोत,के.के.चौगले,भाऊ कांबळे,जी.के.कांबळे,पांडुरंग कामत,बळीराम काकडे यांचे सहकार्य लाभले.ग्रंथपाल भाग्यश्री माळवी यांनी स्वागत केले.शाकिरा नाईकवडे यांनी आभार मानले.
✍️ आयु.र.वि.माळापुडेकर
८६९१८८३२१४