
मोबाईलचा योग्य वापर करून शैक्षणिक ज्ञान वाढवा. प्रा. शरदचंद्र कांबळे
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
श्री मनोहरराव नाईक जुनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा. शरदचंद्र कांबळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक १५ जानेवारी २०२५ संध्याकाळी सारकिन्ही ता.महागाव पार येथे पाडले कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वेशात गावातील विद्यार्थी, जेष्ठ मंडळी ,महिला यांच्यामध्ये गाडगे बाबाच्या कीर्तनातून प्रबोधन केले. गावातील प्रतिष्ठित मंडळी, विद्यार्थी ,यांच्याशी कीर्तनाच्या माध्यमातून संवाद साधला. ग्रामीण भागाला रुचेल अशा साध्या भाषेत समाजात वाढत चाललेली अंधश्रद्धा ,तसेच शिक्षण ,ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, आजची तरुणाई, व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कितपत करावा. अशा अनेक विषयावर कीर्तनाच्या माध्यमातून प्रा.शरदचंद्र कांबळे सरांनी प्रबोधन केले .
तसेच संगीत विषय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुद्धा नृत्य, नाटिका सादर केल्या .प्रा वसंत राठोड त्यांचे सहकारी श्री संतोष बोंबले ,सुप्रसिद्ध युट्यूब गायक मा गजानन राठोड सर, यांनी बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. एस एम जाधव सर व प्रा आदेश खाडे सर यांनी केले . प्रा काळे सर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले.शेख अमिर सर यांनी उपस्थिताचे आभार मानले.