ऋषिकेश मोहिते धुळे तालुका प्रतिनिधी……
दिनांक : 16/12/2024
प्रति,
१) मा. जिल्हाधिकारी साो. जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे
२) मा. पोलीस अधिक्षक साो. पोलीस अधिक्षक कार्यालय, धुळे
विषय :-महिला, विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे बाबत. अटकसत्र, कोम्बिंग तात्काळ थांबवणे बाबत. संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करणे बाबत.
महोदय,
सविनय सादर कि, परभणीमधील घटनेचा निषेध आहे.
1) संविधान विटंबना करणाऱ्या समाजकंटक आरोपीचे मास्टरमाईंड अटक झाले पाहिजेत.
2) दंगलीच्या नावाखाली निरपराध आंदोलक, आंबेडकरी महिला, विद्यार्थ्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. तात्काळ अटकसत्र थांबवावे.
3) दलित वस्ती भीमनगर, प्रियदर्शनीनगर मधील बेकायदेशीर कोम्बिंग थांबवावी.
4) कोम्बिंगची चौकशी करून जखमी समाज बांधवांचे स्टेटमेंट घेऊन अमानुष अत्याचार करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी.
5) चौकशी न करता दाखल केलेले, चुकीचे तिन्ही एफआयआर रद्द करावेत.
6) दलित वस्तीत घुसून रिक्षा, मोटर सायकल फोडताना पोलिसांचा व्हिडीओ वायरल होतोय त्याची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही झाली पाहिजे.
7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून 100 मीटर अंतरवरील सर्व व्यवसाय बंद करावेत.
8) परभणी व्यापारी महासंघाने दलित समाजावर कार्यवाही करण्याची केलेली मागणी एकप्रकारे ऍट्रॉसिटी आहे. आम्ही व्यापार सुरु करणार नाहीत म्हणणाऱ्या सर्वांचे शॉप ऍक्ट लायसन्स रद्द करावेत परभणी शहरात व्यवसायिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार हा राजकीय आहे. व्यापाऱ्यांना फूस लावून सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याची
9) जिल्हा अधिकाऱ्यांनी व पोलीस अधीक्षकांनी बौद्ध वस्तीमध्ये शांतता बैठक घेऊन चौकशी करावी.
भयभीत समाजाला विश्वास निर्माण केला पाहिजे.
बेरोजगार शिक्षण घेणारे तरुण कोम्बिंगच्या भीतीने आजूबाजूच्या भागात लपले आहेत. ते मानसिक तणावात आहेत. त्यांनी जीवाचे बरेवाईट करू नये. त्यांना त्यांचा रोजगार, शिक्षण करता यावं यासाठी त्यांना टार्गेट करू नये. परभणी सोडून गेलेल्या सर्वांना परत येण्याचे आवाहन प्रशासनाने करावे
11.) भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला असून संबंधीत पोलीस अधिकारी, आरोग्य तपासणी अधिकारी, जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल करावा.
12) शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
13) अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी.
14) परभणी गुन्हे शाखेतील पी. आय अशोक घोरबांड यांची चौकशी करुन यांच्यावरही गुन्हा दाखल करुन निलंबित करण्यात यावे.
वरील महत्वपूर्ण मागण्याची तात्काळ दखल घ्याल ही अपेक्षा! अन्यथा समस्त युवक आंबेडकरी समाज, धुळे यांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन अथवा मोर्चा काढण्यात येईल.