Homeसामाजिकसंविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा..!!

संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा..!!

संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा..!!

सिद्धार्थ कदम
पुसद शहर प्रतिनिधी

संविधानाचा अमृत महोत्सव” साजरा करण्याच्या उपक्रमामध्ये कोषटवार दौलत खान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे आज दिनांक 9 जाने 2025 रोजी कल्पना आडे (बावने )मॅडम ह्यांनी आतापर्यंत संविधानावर बोललेल्या सर्व ज्येष्ठ शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. सांस्कृतिक आणि बौद्धिक ठेव्याचे प्रतीक आहे. असे संस्कृतचे महत्त्व विशद करून संस्कृत मध्ये संविधानाचे वाचन केले व विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुसरण केले. ह्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे , पर्यवेक्षक अनंत जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शारीरिक शिक्षक विजय पाटील व सर्व शिक्षकांनी आडे मॅडमचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Most Popular