ऋषिकेश मोहिते धुळे तालुका प्रतिनिधी….
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अफार्म संस्था पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि Atlas copco group यांच्या आर्थिक सहयोगाने सीएसआर निधी अंतर्गत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प साक्री तालुक्यातील आमळी शिवारातील सहा गावांमध्ये एप्रिल २०२४ पासून राबवण्यात येत आहे. या प्रकल्प अंतर्गत पाणलोट विकाससाठी शेत बांध बंधीस्ती, शेत सपाटीकरण, जुन्या जाल्स्रोतातील गाळ काढणे, पडीक क्षेत्रावर सलग समतल चर आदि कामे तसेच फळबाग लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकर्यांना प्रशिक्षण, सूक्ष्म सिंचन सेट वितरण, फळ बागेसाठी रोपांचे वितरण आदि उपक्रम पुढील तीन वर्षात राबविण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातील कामे राबवण्यासाठी परिसरातील सी एस सी धुळे साक्री एम एच आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी लि., कुरुसवाडे चे चेअरमन श्री. किरण पवार यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य राहिले आहे. प्रकल्प अंतर्गत प्रकल्प गावातील शेतकर्यांना शेती व पाणलोट विकास बाबत अद्ययावत माहिती प्राप्त व्हावी या उद्देशाने दि. ०३/१२/२०२४ रोजी कृषी विज्ञान केंद्र, धुळे व शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथे एकदिवसीय शेतकरी क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर भेटीदरम्यान सहभागी शेतकर्यांना कृषी विज्ञान केंद्र तसेच शासकीय कृषी महाविद्यालय येथील विविध विषय तज्ञांशी भेटून चर्चा केली , तसेच त्याच्या व्याख्यानाचा लाभ घेता आला व काही प्रात्यक्षिक क्षेत्रे पाहता आली. आमळी शिवार हा भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ, चढ उताराचा व जास्त पावसाचा भाग असल्याने तेथिल शेती व पाणलोट विकास समोरील आव्हाने याबाबत उपस्थित तज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र तर्फे डॉ. डी आर नांद्रे, डॉ.ए ए पाटील, डॉ.आर व्ही कडू, डॉ.एस पी निकम यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. इंजी. ए ए राउत यांनी सूत्रसंचालन केले तसेच अफार्म संस्थेतर्फे प्रकल्पाचे संचालक श्री. संदिप गाडे याच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे व्यवस्थापक व इंजि. श्री. अक्षय सानप, श्री. मुरलीधर चौधरी, संदिप काकड, गजानन गोकनवार तसेच सर्व सहा गावातील पाणलोट सेवक आदि. यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली.