आंबेडकरी बौद्ध समाज बांधवानो निवडणूक आटोपली,आता पुढे काय?
महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका एकदाच्या आटोपल्या. निकालाची प्रतीक्षा आहे,तसे आमच्यासाठी “दोघेही” सारखेच आहेत “दगड आणी दगड”. या निवडणुकीत आंबेडकरी समाजात कधी न पहायला मिळालेला “उत्साह आणि उत्स्फूर्द प्रतिसाद” याचा अनुभव आला आणि हे चांगले लक्षण आहे.आंबेडकरी समाजास कळले आणि कळायला लागले की “सत्तेचे दार कुलूप” आमच्या “चाबिने” पण उघडू शकते.समाजहित चौकटीच्या बाहेर ठेऊन भाजपाची अनावश्यक भीति,दहशत निर्माण करून “एडवांटेज टू काँग्रेस” खेळ खेळणारे (श्री.सागर तायडे साहेब यांचे अनेेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार “सोन्याचे,चाँदीचे,स्टीलचे चमचे,बुद्धिजीवी विचारवंत,साहित्यिक,लेखक,संपादक मंडळी) उघड झालेत.काँग्रेसने यांना “बंधनातून” मुक्त केल्यामुळे आता हे सगळे “सामाजिक बांधिलकी,धम्म प्रचार इत्यादी साठी पुढचे चार-साडेचार वर्ष मोकळे आहेत.समाजाने यांना आता असेच मोकळे राहू द्यावे,जास्त क्रिया- प्रतिक्रिया देऊन यांचे महत्व वाढवू नये.निवडणुक काळात, निवडणूकीच्या आदल्या दिवस पर्यंत (ज्याला निवडणूकीच्या भाषेत “कत्तल की रात या समय” म्हणतात) काय लिखाण होते किंवा प्रकाशित होते यावरच आपण सामाजिक बांधिलकीसाठी किती गंभीर आहोत हे ओळखायाला येते व “नकाब” दूर होतो. निवडणूकीच्या दिवशी किंवा नंतरच्या प्रकाशणाला अधिक महत्व नसते त्याला “सारवासारव” म्हणता येईल.भाजपाला हरविण्यासाठी व काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपल्याच समाजावर किंवा नेत्यावर “चिखलफेक” करणारे लेख प्रकाशित करने याला “सामाजिक बांधिलकी” म्हणायचे काय याचा विचार समाजाने, हितभाग चिंतकानी करावा,नुसतेच मूंग गिळून गप्प राहू नये.मी सफाई देत नाही व मला त्याची गरज पण नाही आहे.परंतु ज्यांना विजयी करण्यासाठी चिखलफेक केली, त्यांच्या नेत्यांचे कपड़े व चेहरे या ही पेक्षा जास्त चिखलाने माखून आहेत,समाजाच्या रक्ताचे डाग यांच्या चेहऱ्यावर व वस्त्रावर कायमचे आहेत.मी स्पष्टपणे सांगितले होते की माझे लेख प्रकाशित नाही करायचे आहेत तर नका करू,मला वाईट वाटनार नाही, तो तुमचा अधिकार आहे पण आपल्याच समाज नेत्यावर टीका टिप्पणी किंवा दोषारोपण करणारे लेख या माहौल मधे प्रकाशित करू नका.समाजहित दाखवून काँग्रेस किंवा भाजपाला विजयी करण्याचे आव्हान करने सुद्धा वाईट नाही परंतु त्यासाठी आपल्याच समाज नेत्यावर चिखलफेक करणे शहाणपनाचे नाही.शेवटी अश्या प्रकाशनाने काही फरक पडला असेल असे मला वाटत नाही परंतु प्रकाशकांनी डोळेझाक केल्यामुळे त्यांच्यावर “सितोडे” उड़णारच.”काँग्रेस व भाजपासाठी संविधान रक्षण,आरक्षण रक्षण हे सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा ती निरंतर टिकवून ठेवण्यासाठी व्यवसायिक मुद्दे आहेत,चुनावी जुमले आहेत जसे हरेक खाते में 15 लाख”. काँग्रेस आणि भाजपा दोघांनीही फायदयासाठी अनेकदा संविधानाची तोड़मरोड़ केली आहे,हत्त्या केली आहे असे पण म्हणू शकतो याचे अनेक उदाहरण देता येतील परंतु आता ती वेळ नाही आहे.जर भाजपा जातीवादी आहे तर आमच्या साठी काँग्रेस ही “धर्मनिरपेक्ष” नाही आहे,असती तर शिख धर्माप्रमाणे अनुसूचित जातीचे केन्द्रीय स्तरावरचे आरक्षण हे 60 वर्षा पूर्वीच मिळाले असते व आजच्या घडीला बौद्धांची जनसंख्या निदान 5 कोटी असती जी आज 1 कोटी ही नाही आहे,समाज आणखी प्रगत व साधन सम्पन्न राहला असता.केन्द्रीय स्तरावर बौद्धांना आरक्षण न मिळण्यामागे ही तथाकथित “आंबेडकरी विचारवंत” नव-नवीन जावई शोध लावून आरएसएसला दोष देतात.भाजपा काही संपणार नाही आहे व हारली तरी कमजोर होणार नाही आहे. 4 वर्षानंतर भाजपाची दहशत निर्माण करून काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्यासाठी व गरजेनुसार आपल्याच समाज नेत्यावर बेछुट आरोपाचा भडीमार करण्यासाठी नवीन “रोपे” (सोने,चांदीचे चमचे…. )उगवतील. काँग्रेस या रोपट्यांना “शेणखत” पुरवेल,गढूळ पाण्याने (कारण समाज हिताचे स्वच्छ पानी यांना हजम होत नाही) सिंचित करेल,काही जुन्या फांद्याना नवीन पालवी फुटेल काँग्रेस “टॉनिक” देऊन त्यांची ही “देखभाल” करेल.
आंबेडकरी समाजाने समाज हिताकडे लक्ष्य देण्याची गरज आहे.लाडकी बहीण (रू.1500/-,2100/-,3000/-) सारख्या योजना राबाविण्यासाठी भरपूर निधि लागतो आणि पैशाचा पाऊस पडत नसल्याने सामाजिक कल्याण,दलित सुधार,शिक्षा,स्वास्थ सारख्या योजनेत कपात केली जाते, किंवा पर्याप्त निधी मिळत नाही.यामुळे सर्वात जास्त समाजाचे नुकसान होते. नियमित शिष्यवृत्ती,प्रशिक्षण खर्च,रोजगार/ व्यवसाय, शासकीय नौकरी,सहायता/सब्सिडी इत्यादी प्रभावित होतात याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.
लोकशाहीमधे निर्वाचित प्रतिनिधी यांना सन्मान देणे आवश्यक आहे.राजकारणात कोणीच शत्रु नसतो,परिस्थितीनुसार सामाजिक हित लक्षात ठेऊन राजकीय मित्र व विरोधक ठरवावे लागतात,बदलत असतात.जनतेने ज्यांना सत्तेवर आरूढ़ केले त्यांच्या सहकार्याने जनप्रतिनिधि नात्याने समाज हिताचे कार्य केल्या जाते.शत्रु म्हणून मान्यता दिली तर ते आमचे कोणतेच काम करणार नाहीत व आम्हाला पण त्यांच्याकड़े जायला अवघड वाटेल.भाजपा,काँग्रेस महाशत्रु,शत्रु,जातिवादी सारख्या फिलॉसॉफी वर लक्ष्य देऊ नये,फिलॉसॉफी झाडणारे मदतीला येणार नाहीत हे लक्षात ठेवावे,ग्राउंड लेवल वर सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणे अति आवश्यक आहे.अश्या फिलॉसॉफी निगेटीव विचार बिंबवितात ज्यामुळे आपसी सौहाद्र,सम्बन्ध कमकुवत होतात.आमच्या समाजाचे बरेच लोक काँग्रेस आणी भाजपा मधे ही आहेत त्यांना शत्रु किंवा जातिवादी म्हणून गणने योग्य नाही आहे.शत्रु आणि वैचारिक विरोधक या मधे अंतर समझावे लागेल, राजकारणात कोणीच शत्रु नसतो.परिपक्व सामाजिक नेते, कार्यकर्ते राजकारणात जास्त ढवळाढवळ न करता सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन समाज हिताचे कार्य करीत असतात.
आंबेडकरी समाजाने आज पर्यंतचे कटु अनुभव लक्षात ठेऊन नव्याने वाटचाल करायची आहे.बदललेल्या परिस्थिती अनुसार आम्हाला परिवर्तन करावे लागेल.स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान या सोबत तड़जोड़ न करता परिवर्तन करावे लागणार आहे. वरून म्हणजे “हाई लेवल वर” नेते एकत्रित किंवा संगठित होतील याची वाट पाहु नये हे फक्त आईकाला व कानाला सुकून द्यायला बरे वाटते. येणाऱ्या 100 वर्षात ही नेते ऐकत्रित,संगठित होणार नाही आहेत व आज 50 शकले दिसतात ते आणखी वाढणार आहेत हे चांगल्या प्रकारे माहिती असल्यावरही या मधे ऊर्जा ख़र्च करने व्यर्थ आहे व “निगेटिव्ह विचार” वाढविणे आहे. या मधून बाहेर निघावे लागेल. कोणीही असो (कवाडे सर,गवई साहेब,आंबेडकर साहेब,कुम्भारे,आठवले इत्यादी) विनाकारण आपल्याच नेत्यावर टीका टिप्पणी,दोषारोपण करायचे नाहीत,समाज विकासाच्या चळवळीत त्यांनी योगदान दिले आहे त्याची जाणिव ठेऊन पातळी सोडून विधान/ लिखाण करायचे नाही.आपण आपलेच इतरासमोर “वस्त्रहरण” करायचे नाही. संगठित होण्याची प्रक्रिया आता “वरून खाली” सोडून “खालून वर” आरंभ करावी लागेल.पुढच्या लेखात या विषयी सविस्तर विचार व्यक्त करील.
एक दिवसानंतर निकाल बाहेर येतील.काँग्रेस- मविआ चे सरकार येण्याची संभावना कमी आहे, आले तरी “क्लीन स्वीप” राहणार नाही, “एकदम निकट” भाजपा राहिलच त्यांना 15-20 एमएलए मॅनेज करायला जास्त परिश्रम करावे लागणार नाही कारण भाजपाला शत्रु क्रमांक 1 मानून ज्यांना निवडून दिले त्यापैकी बरेच “बाजारात” मोलभाव करतांना दिसून येतील.आंबेडकरी विचारवंत,प्रचारक यांना भावी वाटचाल साठी शुभेच्छा. 4 वर्षानी परत नवीन जोमाने समोर यावे.जेव्हा राजकारणात शत्रु नसतात तर समाज कार्यात याला स्थानच नसते. समाज कार्यात फक्त वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असतात.
✍️लक्ष्मण बोरकर- ७७०९३१८६०७,नागपूर,✍️