शिंदखेडा
संजय कोळी, शिंदखेडा प्रतिनिधी…
अक्कडसे येथील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकाने प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने गळफास घेत संपविले जिवन
शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे गावातील आदिवासी अल्पवयीन मुलीला दिवसाढवळ्या अपहरण करुन गावातील विवाहित पुरुषाने पळवुन नेले.
त्या अल्पवयीन मुलीच्या काकांना चांदसे तालुका शिरपुर येथे तुमची मुलगी आहे असे खोटी माहिती देत बोलवुन घेतले व बेदम मारहाण करण्यात आली.
अल्पवयीन मुलीच्या काकाच्या तोंडातुन रक्ताच्या उलट्या होईपर्यंत मारहाण फुस लाऊन पळवुन नेणाऱ्याच्या साथीदारांनी केली.
पण शिंदखेडा तालुक्यातील पोलीसांनी आठ दिवसापर्यंत गुन्ह्याची नोंद केली नाही..
उलट अल्पवयीन मुलीच्या पालकांना दमदाटी दिली.
त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते,मुलीच्या नातेवाईक व अक्कडसे गावातील गावकरी यांनी दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी भगवा चौक ते शिंदखेडा पोलीस स्टेशन पर्यंत शासनाचा निषेध करत मोर्चा काढला.
यावेळी आरोपींचा व अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन अल्पवयीन मुलीच्या परीवाराला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन पोलिस प्रशासना मार्फत देण्यात आले होते.
तद्नंतरही अल्पवयीन मुलीच्या पालकांवर आरोपीच्या परीवाराकडून चाकुने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या घटनेला ४/५ महिने होत आले परंतु अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपींवर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
या सर्व जाचाला कंटाळून व प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीचे पालक कैलास आत्माराम सैंदाणे यांनी आज दिनांक ४/१२/२०२४ वार बुधवार रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान अक्कडसे तालुका शिंदखेडा येथे आपली जिवन यात्रा संपवली..
प्रशासनाकडून आता तरी एक आदिवासी अल्पवयीन मुलीच्या परीवाराला न्याय मिळेल का?
अशा अनेक घटना आदिवासी परिवारांवर या शिंदखेडा तालुक्यात झाल्या आहेत परंतु त्यांना अद्याप न्याय मिळत नाही याला जबाब दार कोण..
आरोपींवर कुणाचा आशिर्वाद आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
मुंबई 24 लाईव्ह न्यूज करीता, संजय कोळी, शिंदखेडा