संघटित होणे ही काळाची गरज!!
निसर्गाच्या सान्निध्यात राहाणारे पशूपक्षी यांचं बारकाईने निरीक्षण केले की लक्षात येतं.
जंगलातील हिंसक प्राणी हे अहिंसक प्राण्यावर हल्ला करून त्यांना ठार मारुन किंवा त्यांची हत्या करुन ते उपजिविका चालवीत असतात.
नेहमी मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची शिकार करून जीवन जगत असतात.
या हिंसक प्राण्यांपासून स्वतः चे संरक्षण करता यावे यासाठी शाकाहारी प्राणी जंगलात उदाहरणार्थ
हरीण,गवे रेडे,नीलगाय, जिराफ, हत्ती,चौशिगा,बारशिंगा, भेकर,चितळ, इत्यादी एकत्रितपणे कळप करून वास्तव्य करीत असतात.हिंसक प्राणी शाकाहारी प्राण्यांच्या कळपा शेजारी आलेल्यांची चाहूल लागताच एक मेकांना सावधानतेचा इशारा देऊन पळून जात असतात.त्यातूनही तो हिंसक प्राणी हल्ला करण्यासाठी शाकाहारी प्राण्यांच्या कळपात शिरला तर शाकाहारी प्राणी एकसंघ होऊन बचाव करण्यासाठी एकत्रितपणे त्याला पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
सर्व प्राण्यांची एकजूट पाहून हिंसक प्राणी घाबरून हल्ला करण्या ऐवजी पळून जातात.
शाकाहारी एकत्रितपणे राहातं नसतील.विभक्त असतील तर अशा वेळी हिंसक प्राणी हल्ला करून त्यांना मारुन खाऊन त्यांचें आयुष्य संपवितात.
एखाद्या वेळेस हिंसक प्राण्यांच्या हल्याच्या वेळी मदतीसाठी ओरडून हाक मारत असतील.तर शाकाहीरी प्राणी मदतीसाठी जिथे असेल तेथून धावून पळत येतो . आणि त्याची संकटांतून सुटका करण्यासाठी एक संघ प्रयत्न करत असतात.
ज्या प्रमाणे जंगलातील प्राणी स्वतः च्या संरक्षणासाठी एकत्रितपणे राहत असतात.
त्याच प्रमाणे निसर्गातील शाकाहारी पक्षी ही हिंसक पक्षांच्या हव्या पासून बचाव करण्यासाठी एकत्रितपणे कळपाचे थवे करून झाडावर आसरा घेत असतात.ज्या त्या जातीचे पक्षांचे थवे(कळप) आपणास एकत्र राहत असलेले आढळतात.
उदाहरणार्थ, चिमणी, पोपट,तितार, कावळा,बगळा,मैना,मोर, इत्यादी.
नाले,ओढे,नदी,हे देखील एक मेकांना सोबत घेऊन वाहतं जाऊन एकत्रितपणे मिळतात.
म्हणुनच त्या सर्व पाण्याचे एकत्रित होऊन भला मोठा महासागर तयार होतो.आणि त्या महासागरातील पाण्याची पातळी पाहून अनेकांना धडकीच भरते.
माणस ही एकाच ठिकाणी अनेक घर बांधून राहतं असल्यामुळे एका गावात रुपांतर होते. त्याला आपण गाव हे नाव देतो.अनेक गावांचा मिळून तालुका होतो.अनेक तालुक्यांचा जिल्हा तयार होतो.अनेक जिल्ह्यांचे मिळून एक राज्य तयार होते.अनेक राज्य मिळून एक देश तयार होतो.अनेक देश मिळून एक जग तयार होते.
एखाद्या गावांमध्ये.दुसऱ्या गावातील माणसं येवून कुणाला त्रास देत असतील !आणि संपूर्ण गावातील माणसं एकत्रितपणे येवून त्यांना विरोध्द केला तर त्रास किंवा धमकी देणारी व्यक्ती घाबरून तेथून पळ काढतात.
हत्ती,गवारेडा, जिराफ, नीलगाय, इत्यादी ताकदवान प्राणी एका हिंसक प्राण्याला मारणं शक्य होत नाही म्हणून सध्या हिंसक प्राणीही कळपाने संघटन करून राहायला शिखलेत.
जीवनात येणाऱ्या प्रसंगां नुसार सयशस्वी होण्यासाठी.स्व अनुभवातून जंगलातील प्राणी आपल्या वागण्यात बदल करून नवीन ज्ञान शिकण्याचा प्रयत्न करीत असतात.
गावातील लोक एक मेकांच्यात
असलेल्या मतभेदांमुळे ,एकत्र येत नाहीत.जाऊदे तिकडे.आपल्याला घेऊन काय करायचे.त्याच तो बघून घेऊ दे.असा विचारांमुळे आपण एकत्र येऊन संघटितपणे विरोध केला नाही. त्याचं तो बघून घेवूदे! म्हणून असा विचार केला. तर दुसऱ्या गावातील लोक येऊन गावातील माणसाला मारहाण करून आरामात जातील.
यांत काही शंकाच नाहीं.
अशाच पद्धतीने आपण लोक वागत राहिलो.तर गावामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित राहणार नाही.माणसात भिंतीचे वातावरण पसरेल. सर्वत्र वातावरण बिघडून शांतता, कायदा , सुव्यवस्था अबाधित राहणार नाही.
याचा सर्वांनी एकत्रितपणे विचार करणं गरजेचं आहे.
आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक विविध समाजात विभागले गेले आहेत. बरेच समाजात विभागले गेले आहेत.
इतर समाजातील जाती धर्मातील लोकांच्या कडून त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेतात.उदा. मुसलमान हे लोक कुठे ही राहू द्या. ते कट्टर आपल्या धर्माशी एकनिष्ठ असतात.
त्यांच्या धर्माच्या धर्म गुरूंच्या शिकवणी प्रमाणे किंवा मार्गदर्शनाखाली ते नेहमी वागत असतात.
त्यांच्या अल्लाची दैनंदिन प्रार्थना, करणे.हे त्यांना संस्कारांचे बाळकडू बालपणापासून पाजलेलं असते.त्याचं ते पालन करुन एकत्र संघटीत राहातं असतात.
अशाच पद्धतीने शीख,साई, ख्रिश्चन,जैन, निर्वासित मारवाडी, ज्या त्या जाती धर्मातील लोक धर्माच्या शिकवणी प्रमाणे आचरण करत. एकमेका बद्धल आपुलकीने, गुण्यागोविंदाने एकत्रित संघटन करून राहत असतात.
आपापल्या समाजातील गरीब सर्व व सामान्य कुटुंबातील लोकांना वेळ प्रसंगी आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या फंडांमध्ये प्रत्येकजण महिन्याच्या मिळकती मधून ठराविक रक्कम जमा करीत असतात.जमा झालेल्या फंडातून
गरीबांना वेळ प्रसंगी आर्थिक मदत करीत असतात.किंवा समाजासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित
असतात .
सध्याची आपल्या देशातील परिस्थिती पाहता. समाजातील सर्व स्तरांतील गटात ताटातील मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या संरक्षणासाठी एकसंघ
किंवा संघटित राहाणे अत्यंत आवश्यक आहे.ही काळाची गरज आहे.
समाजातील जे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थापोटी संसारात गुंतून राहतात. ते सामाजांच्या हितासाठी कांहीं करू शकत नाहीत.आणि जे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थापोटी संसारात कायमचे गुंतून राहत नाहीत.तेच कार्यकर्ते समाजासाठी काहीतरी करू
शकतात.
असे संघटन प्रत्येक तालुकास्तरीय, प्रत्येक जिल्हास्तरावर त, प्रत्येक राज्यस्तरावर,अशा पध्दतीने संघटनांचे नियोजन करून उभ्या केल्या शिवाय दुसरा कोणताही प्रर्याय नाही.
निसर्गातील शाहाकारी पशूपक्षांना कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन शाळा, काॅलेजमध्यून दिलं जातं नसतानाही स्वतः च्या संरक्षणासाठी हिंसक प्राण्यांपासून एकत्रितपणे संघटित राहत असतात.त्यांच्या कडून बरंच काही शिकायला मिळते.
बौद्धिसत्व, महामानव, भारतरत्न, डॉ .बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या संविधानाच्या हक्क, अधिकार,न्याय,समता, बंधुता, स्वातंत्र्य, मिळालेल्या सुख सुविधांच्या मुळे समाज व्यक्तीगत स्वार्थापोटी झोपलेल्या अवस्थेत असलेला आपणास पहावयास मिळतो.आहे.
बाबासाहेबांच्या कृपेने आपलं आयुष्य सुखात गेले. पण पुढच्या पिढीचे काय? असा प्रश्न नेहमी डोळ्यासमोर उभा राहतो. सध्याच्या परिस्थितीचा विचार वेळीच नाही केला तर पुढची पिढी आपल्याला कदाचित ही माफ करणार नाही.दिवसेंदिवस महाभयानक परिस्थिती निर्माण होऊ पहाते.अत्याचार, सर्व सामान्य जनतेवर होणारे हल्ले आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
याचा समाजातील जागरुक तरुणांनी एकत्रितपणे येऊन संघटन करण्याची काळाची गरज आहे असे वाटते.
माणूस शिकला शिक्षणातून सुशिक्षीत झाला.व्यक्तीगत स्वार्थापोटी बंगल्याच्या कंपाऊंडला लाॅक लावून
झोपेचं सोंग घेऊन बसल्याचे दिसून येत आहेत.खरोखर जे झोपलेले आहेत.त्यांना झोपेतून उठवता येते.पण ज्यानं झोपेचं सोंग घेतले आहे. त्यांना उठवता येत नाही.
परिस्थिती नुसार बदलत राहाणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलू पाहाणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा.
जे माणसं समाजासाठी जागृत होऊन कार्य करण्यासाठी सदैव , विचारांने जागृत होऊन जागे आहेत. त्यांना संघटित करण्याची खरी गरज आहे.एकत्रित येवून संघटित राहिला
तरच टिकला. नाहीतर मनुवादी व्यवस्थेच्या हिंसक प्राण्यांपासून सामान्य माणसाच्या वर हल्ले चढविले
जाऊन नायनाट केला जाईल. पुर्वीची परिस्थिती यायला फार वेळ लागणार नाही.सावद व्हा. संघटित व्हा, आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणारऱ्या पशुपक्षी यांच्या कडून काही आदर्श म शिकून माणसाण शहाणं व्हावे.
पशुपक्ष्यांच्या पेक्षा मानव परिपूर्ण विकसित झालेला असून ही तो माणसा सारखा वागत नाही हेच खरं दुर्भाग्य आहे.
डॉ.बाबासाहेबांनी आपल्याला महामंत्र दिलेला आहे.शिका संघटित व्हा आणि अन्याया व विरुद्ध संघर्ष करा
देशमुख पी. आर.
9921111955