रत्नागिरीत मनसेमध्ये महिलांच्या प्रवेशाचा धडाका
रत्नागिरीत मनसेच्या जुन्या शिलेदारांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत आणि सन्माननीय श्री. राज ठाकरे यांच्या विकासाच्या विचारांनी प्रेरित होत, मनसे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश सौदंळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाध्यक्ष श्री. अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
श्री. राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मांडलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर विश्वास ठेवून, भविष्यातील प्रगतीसाठी मनसे हवीच, अशी भावना या महिलांनी व्यक्त केली. या प्रवेशाच्या उपक्रमाला मनसे नेते सचिन शिंदे, संपदा राणा, आणि बाबय भाटकर यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रवेश केलेल्या महिलांमध्ये बिस्मिला नदाफ, सानिया नदाफ, मासुमा शेख, चौडावा बडगैर, शमा मुल्ला, मंगल पाथरोट, सायरा नदाफ, समृद्धी सुर्वे, क्रांती सुर्वे आणि रोबर्ट यांचा समावेश होता. या महिलांनी मनसेत सामील होण्याचा निर्णय घेत, पक्षाच्या विकासवादी दृष्टिकोनावर विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, बाबय भाटकर, विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम आणि महाराष्ट्र सैनिक स्वप्नील सुर्वे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीतील महिलांचा मनसेत झालेला हा सामूहिक प्रवेश पक्षाला नवसंजीवनी देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.