
धुळे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश मोहिते
शिंदेखेडा तालुक्यातील निशाणे गावातील मनाला हेलावून टाकणारी घटना घडली आहे किरकोळ वादातून एका पत्रकारावर 10 ते 11 व्यक्तींनी जीवघेणा जातीवादी हल्ला करण्यात आला आहे पीडित पत्रकार जतन नगराळे हे गंभीर जखमी असून त्यांच्या संपूर्ण घराची तोडफोड करुन जातीवाचक शिवीगाळ करून घरकुल योजनेचे आलेले पैसे देखील लांबवले आहेत असा आरोप करण्यात येत आहे सध्या त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ऑल इंडिया पँथर सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांच्याशी बोलताना त्यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली या ठिकाणी त्यांनी असा आरोप केला की संक्रात झाल्यावर रात्री बारा वाजे दरम्यान एक अवैध रेतीने भरलेले मोठे वाहन घराजवळ जात असताना गाडीचा मोठ्याने आवाज येत असल्याने त्या घराजवळील कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली व वाहतूक करणारे घाबरले कि या कुत्र्यांमुळे आपली वाहतूक पकडली जाईल ह्या भीतीने त्यामुळे तात्काळ गाडी थांबून त्या घराजवळ जाऊन जतन नगराळे यांना गावगुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करत तुम्ही महारटे तुमची कुत्रा पाळण्याची औकात आहे का धेडगे तुम्हाला खायला नाही आणि तुम्ही कुत्रे पाळतात आणि आमच्या वर कुत्रे सोडतात तुम्हाला गावातून मारत मारत हाकलून देऊ असे बोलून जतन नगराळे व परिवारावर कुराड व लोखंडे रोडच्या साह्याने हल्ला केला जणू काही रात्रीच जीव घेणे हल्ला करून जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला असा या ठिकाणी आरोप करण्यात आला आहे. ह्या हल्ल्यात पीडित नगराळे हे गंभीर जखमी असून त्यांच्या शरीरावर संपूर्ण जखमा डोक्याला गंभीर मार लागून मेंदू मध्ये रक्तस्राव पसरत आहे. ह्या ठिकाणी असा आरोप देखील करण्यात आला आहे कि हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार गुंड प्रवृत्तिचे असून रेती माफिया व चोर जातीवादी आहेत त्यांनी घटनेठिकाणी असे वक्तव्य केले कि आम्ही भाऊ चे माणसं आहोत आता आमची सत्ता आहे तुम्ही ॲट्रॉसिटी पण टाकली तरी आमचं काही वाकड होणार नाही असा आरोप पीडितानी केला आहे.