
राज्य सरकारने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा!
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे पर्यायाने रोजगार निर्मिती करणे आवश्यक आहे तरुणांना उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी लागणारे भांडवल सरकारने कमीत कमी व्याजदराने उपलब्ध करून द्यायला पाहिजे कर्जप्रकरणात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी लागणारे कर्ज लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी कर्जाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी राज्य सरकारने अटी आणि शर्तीचे प्रमाणात शीतलता आणावी जेणेकरून संबंधित होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपला उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी लागणारे भांडवल मिळविण्यासाठी अधिक सोपस्कार होईल.
औद्योगिक वसाहती मध्ये अर्थात MIDC एरिया मध्ये उद्योग उभारणी करण्यासाठी लागणारे भूखंड कमीतकमी किंमतीत मिळावे भूखंड घेण्यासाठी सुद्धा प्रक्रियेत शीतलता आणावी असंख्य तरुणांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे आर्थिक भांडवल नसते अशा गरीब आणि होतकरू तरुणांना भूखंड घेण्यासाठी सरकारने सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध करून द्यायला पाहिजे जेणेकरून मेहनती,हुशार,होतकरू तरुणांना भूखंड घेण्याची मानसिकता तयार होईल आणि तिथं उद्योग व्यवसाय उभारणी करता येईल यामुळे राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांना छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल सोबतच अशा उद्योग व्यवसायात हजारो हातांना काम मिळेल पर्यायाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन निर्माण होईल.
राज्यातील प्रत्येक लोकप्रिय लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या मतदारसंघात ठराविक कालावधीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांचा रोजगार मेळाव्याचे आयोजन करून उद्योग व्यवसायासाठी इच्छुकांच्या समस्या समजून होतकरु तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठवला पाहिजे जेणेकरून इच्छुकांना उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी सरकार मदत करेल पर्यायाने आर्थिक उत्पनाचे साधन संसाधन निर्माण होऊन लाखो तरुणांच्या हाताला काम मिळेल.
शिक्षण पूर्ण करण्यासाठी असंख्य संकटांचा सामना करावा लागतो शिवाय शिक्षणासाठी अफाट पैसा खर्च करून उच्चशिक्षण घेतलेल्या तसेच विविध क्षेत्रात इंजिनिअरिंग झालेल्या होतकरु मुलांना सरकारी नोकरी मिळत नसल्याने असंख्य सुशिक्षित तरुणांना खाजगी आस्थापना मध्ये नोकरी करावी लागते खाजगी उद्दोजक आपल्या मनमानी कारभारानेच कामगारांना पगार देतात तरुण टॅलेंटेड असतांना सुद्धा त्यांच्या कलागुणांनुसार मोबदला मिळत नाही तरीही मजबुरीने खाजगी कारखान्यात नोकरी करावी लागते कारण आजच्या तरुणांच्या खांद्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते.नोकरी केल्या शिवाय पर्याय नसतो याकडे सुद्धा सामाजिक क्षेत्रातील जबाबदार पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण करण्यासाठी तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील असे प्रयत्न सरकारने करावे आणि सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला पाहिजे तसेच आपापल्या विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय उभारणी करण्यासाठी पर्यायाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी,आर्थिक उत्पन्नाचे साधन संसाधन निर्माण करून देण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे शिवाय सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक जबाबदार पुढाऱ्यांनी सुद्धा यासाठी इमानदारीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रमोद सूर्यवंशी ८६०५५६९५२१,चिखली मातृतीर्थ बुलढाणा.