Homeलेखस्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न.

स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न.

स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न.

पदोन्नती मधिल आरक्षण पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसह अनेक ठराव पारित.

   विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर येथील रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र राज्य स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व वार्षिक आमसभा संघटनेचे राज्य अध्यक्ष मा.देवानंद फुलझेले (गडचिरोली) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक. ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाले. याप्रसंगी उदघाटक म्हणून छत्रपती संभाजी नगर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अशोक शिरसे साहेब तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.एस.पाटील साहेब, तसेच स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.एन.बी.जारोंडे,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.संजय घोडके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मा.चंद्रहास ढोकणे,स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य सहसचिव मा.गणेश उके,संघटनेचे सरचिटणीस मा.शामराव नागदेवे,मानद राज्य अध्यक्षा श्रीमती मिनाक्षी बनसोड,मा.बाबासाहेब हजारे इत्यादी विचारमंचावर उपस्थित होते. 

     दोन दिवस प्रचंड उपस्थितीत संपन्न झालेल्या या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाल्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.याप्रसंगी पदोन्नती मधिल आरक्षण पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसह २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे वेतन पुननिर्धारण करणे,पंचायत अधिकारी यांचेवर लादण्यात येणारे अतिरिक्त काम कमी करणेआदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आगावू वेतनवाढ लागू करणे,महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सायंकाळी साडेसहा नंतर कार्यालयीन कामकाज करण्यास भाग न पाडणे,एकाच व्यक्तीद्वारे माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्यावर पायबंद घालणे इत्यादी ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले.

      यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.एस.पाटील साहेब यांनी भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासावर सखोल मार्गदर्शन केले व देशपातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन या फुले आंबेडकरी विचारांच्या कामगार चळवळीचे महत्व विशद करून संघटनेला वाढविण्यासाठी अधिक परिश्रम करण्याचे आवाहन केले. 

     उदघाटक म्हणून बोलताना मा.अशोक शिरसे साहेब यांनी संघटीत शक्ती उभारून सभासदांमध्ये जागृती निर्माण करण्याचे आवाहन केले.आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून मा.एन.बी.जारोंडे यांनी कर्मचारी व अधिकारी यांची प्रशासनिक जबाबदारी यासह त्यांची संविधानीक व सामाजिक जबाबदारी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. श्रीमती मिनाक्षी बनसोड यांनी राज्यस्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन केले. डाॅ.संजय घोडके यांनी स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनला अधिक मजबूत करण्यासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

      आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.देवानंद फुलझेले यांनी संघटना निर्माण करण्याची गरज कां भासली यावर विस्तृत मार्गदर्शन करून संविधानीक हक्क व सोयी सवलती प्राप्त करण्यासाठी बहुजन समाजातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एकजूट होणे ही काळाची गरज असून लढल्या शिवाय हक्क प्राप्त होत नसतात याची जाणीव करून दिली व शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्यासाठी संघटनेचे सभासद कटिबद्ध असतील असे सांगितले.

       याप्रसंगी संपन्न झालेल्या विविध सत्रांमध्ये संघटनेचे उपाध्यक्ष मा. प्रेम खिल्लारे, मा. मेघराज दादा गायकवाड,संविधान फाउंडेशन चे मा.गौतम मेश्राम,राज्य कौन्सिलर श्रीमती स्वाती लोंढे,उपाध्यक्ष मा.संजय खोब्रागडे,संघटक मा.नागसेन कांबळे,मा. मिलिंद रंगारी, मा.दिलीप मेश्राम,मा.भैय्याजी मुद्दमवार,सिद्धार्थ मेश्राम यांनी आपले विचार व्यक्त करताना संघटनेस अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

      उदघाटन सत्राचे संचालन मा.संजीव बोरकर यांनी,प्रास्ताविक मा.शामराव नागदेवे यांनी तर आभारप्रदर्शन मा.प्रेम खिल्लारे यांनी केले.या राज्यस्तरीय अधिवेशनास सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सागर तायडे यांस कडून.

RELATED ARTICLES

Most Popular