Homeसामाजिकगावठी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक

गावठी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक

(स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई )

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद :- यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे अवैध शस्त्र ( अग्निशस्त्र ) बाळगणाऱ्या तसेच अउघड गुन्हे आरोपी शोध तसेच गुंगीकारक औषधद्रवाची तस्करी समूळ उच्चाटन व्हावे या करिता पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता (भा पो से ) यांनी पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत
दि १७ / १ / २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमी व्दारे माहिती मिळाली कि मौजे खंडाळा फाटा येथे एक इसम ज्याने अंगात राखाडी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेले त्याचेकडे एक गावठी बनावटीची देशी पिस्टल असून तो खंडाळा फाटा येथे थांबला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ पंचासह खंडाळा फाटा येथे रवाना होवून संशयीत इसम यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सैय्यद समीर उर्फ बाबू सैय्यद कलंदर वय २९ वर्ष रा काझीपूरा अनसिंग ता जि वाशिम असे सांगितल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ गावठी बनावटीचा देशी पिस्टल किंमत अंदाजे ३० ००० रुपये तसेच दोन राऊड ( काडस्तुस ) किंमत २००० रुपये असा एकूण ३२००० रुपये चा माल मिळून आल्याने तो जप्त करून ताब्यात घेवून नमूद इसम यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा येथे अप क्रमांक १७ / २०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ , २५ अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता सा मा अपर पोलीस अधीक्षक यवमाळ श्री पियुष जगताप सा मा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री हर्षवर्धन बी जे सा मा पोलीस निरिक्षक श्री सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शना त सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरिक्षक शरद लोहकरे पोहवा संतोष भोरगे पोहवा तेजाब रणखांब पोहवा सुभाष जाधव पोहवा कुणाल मुंडोकार पोहवा रमेश राठोड पोशि सुनिल पंडागळे चापोउनि रविंद्र श्रीरामे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

RELATED ARTICLES

Most Popular