
सिद्धार्थ कदम
पुसद शहर प्रतिनिधी
पुसद शहरातील वसंतनगर येथे राहणाऱ्या एका युवकाचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोबाईल हरवला होता. तो मोबाईल दोघांना दि.१४ जानेवारी २०२५ रोजी सापडला असता वसंत नगर पोलिसांच्या ताब्यात दिला होता. यामुळे त्या दोन युवकाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
अमजद खान रा.वसंत नगर यांचा मोबाईल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हरवला होता. तो मोबाईल माळ पठार येथील मोप या गावचा रहीवाशी होता.तेथे अंकुश खरात, व लक्ष्मण मस्के- यांना दि.१४ जानेवारी २०२५ रोजी कामानिमित्त पुसदमध्ये आले असता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जाताना अचानक त्यांना तो मोबाईल सापडला होता. त्यांनी तात्काळ वसंतनगर पोलीस स्टेशनला स्वतः जाऊन मोबाईल जमा करण्यात आला. व तो जमा केलेला मोबाईल ज्या मालकाचा मोबाइल होता त्यांचा शोध घेऊन त्याची ओळख पटवली.व त्यानंतर पोलिसांनी मूळ मालकाला मोबाईल परत केला आहे. मोबाईल सापडुन देणाऱ्या अंकुश व लक्ष्मणचे अमजद खान यांनी पोलीस ठाण्यात आभार देखील मानले.