
कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयात,पुसद येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा..
सिद्धार्थ कदम
पुसद शहर प्रतिनिधी
पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय, पुसद येथे दिनांक 15 जानेवारी 2025 ला भारताचे सुपुत्र, 1952 सालच्या ‘ हेलसिंकी ‘ऑलम्पिक मध्ये वैयक्तिक कामगिरीने पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचे’ आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विविध क्रीडा क्षेत्रात नाव कमावलेल्या खेळाडूंचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय स्तरावर सहभागी 4 खेळाडूं व 40 राज्यस्तरीय खेळाडूंना गोल्ड मेडल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे श्री देव चौधरी ( इंडियन अल्ट्रा मॅरेथॉन रनर ) व उत्कृष्ट कुस्तीपटू आणि पंच ज्ञानेश्वर बेले लाभले होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे जीवनातील महत्त्व व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर विचार मांडले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापिका सौ बघेल मॅडम, पर्यवेक्षक जाधव सर, पर्यवेक्षक मुराडी सर, शारीरिक शिक्षक इत्यादी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य मिळाले आहे.