
पुसद बस स्थानक परिसरात अटटल चोरटा पकडला
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
पुसद तालूका प्रतिनिधी
पुसद : यवतमाळ जिल्हात वेगवेगळ्या बसस्थानक परिसरात प्रवाशाचे पर्स व जेब कट करून चोरीचे गुन्हे वाढल्याने मा श्री कुमार चिंता ( भा पो से ) पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी सुचना देवून आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश पारित केले होते
त्याच प्रमाणे पोलीस निरिक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या अधिनस्थ असलेले पोलीस व अमलदार दि १८ जानेवारी २०२५ रोजी रात्री आरोपीचा शोध घेत असताना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की प्रवाशांची पर्स व जेब कर करून चोरी करणारा अटल चोरटा ज्ञानेश्वर रामभाऊ भिसे हा पुसद बसस्थानक परिसरात संशयरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे त्या माहिती प्रमाणे नमूद पथकाचे अतिशय कौशल्यपूर्ण रितीने पोलीस कौशल्याचा वापर करून सापळा रचून शिताफीने पुसद बसस्थानक परिसरात त्यास पकडून त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे जवळ २२ ग्रॅम ६२ मिली सोन्याचे दागिणे किंमत १५८३४० तसेच रोख रक्कम १३५०० रुपये असा एकूण १७१८४० रुपये चा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत त्याचेकडे विचारपूस करता त्याने २०२३ ते २०२४ मध्ये पुसद बसस्थानक उमरखेड बसस्थानक परिसरामध्ये बसणाऱ्या महिला व पुरुष प्रवाशांच्या तसेच ढाणकी बँक परिसर येथे जेब कट करून चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यावरून त्याने एकून ०७ चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून उघडीस आलेले गुन्हे पुसद शहर ३४१ / २०२४ कलम ३७९ भादवी पुसद शहर ७१४ / २०२३ कलम ३७९ भादवी पुसदशहर १७ / २०२४ कलम ३७९ भादवी पुसद शहर २४ / २०२४ कलम ३७९ भादवी पुसद शहर २० / २०२५ कलम ३०३ (२) भान्यासं उमरखेड २८३ / २०२४ कलम ३७९ भादवी बिटरगाव ८२ / २०२४ कलम ३७९ भादवी तसेच यवतमाळ जिल्हयातील चोरीचे गुन्हे करणारा अट्टल चोरटा ज्ञानेश्वर रामभाऊ भिसे वय ४७ वर्ष रा लाख रायजी ता दिग्रस जि यवतमाळ एकूण २२ ग्रॅम ६२ मिली सोन्याचे दागिने किमंत १५८३४० रुपये तसेच रोक रक्कम १३५०० असा एकूण १७१८४० रुपये मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात दिले
सदरची कारवाई मा पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता सा मा अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सा मा पोलीस अधिक्षक तथा अति पोलीस अधिक्षक हर्षवर्धन बी जे मा पोलीस निरिक्षक सतिष चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरिक्षक गजानन गजभारे पोउनि शरद लोहकरे पोहवा संतोष भोरगे पोहवा तेजाब रणखांब पोहवा सुभाष जाधव पोहवा कुणाल मुंडोकार पोहवा रमेश राठोड पोशि सुनिल पंडागळे चापोउनि रविंद्र श्रीरामे सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली