
डॉ. सौरव राठोड यांचा व्हॉइस ऑफ मिडिया पुसदच्या वतीने सत्कार
पुसद प्रतिनिधी
व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटना पुसदचे कोषाध्यक्ष, दै.लोकमतचे प्रतिनिधी, श्री.वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.शेषराव राठोड यांचे सुपुत्र डॉ. सौरव शेषराव राठोड यांनी भारतातील फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम FMGE ह्या वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास झाल्याबाबत व्हाँईस आँफ मिडिया पत्रकार संघटना पुसदच्या वतीने त्यांच्या विद्यानगर पुसद येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
भारतात नीटची परीक्षा दिल्यानंतर दोन मार्काने एमबीबीएस चा प्रवेश हुकल्यामुळे त्यांनी परदेशात म्हणजेच किरगिझस्तानात एमबीबीएस चा प्रवेश केल्यानंतर foreign medical graduate exam ही परीक्षा अतिशय कठीण समजले जाते या FMGE परीक्षा दिल्ली, मुंबई न जाता घरीच स्वयं अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात प्रथम श्रेणीत पास झाल्याबद्दल डॉ. सौरव. राठोड यांचा शाल ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला .
यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया सा. विं. यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेश ढोले, कार्याध्यक्ष शेख शब्बीर, उपाध्यक्ष राजू सोनुने,पुसद तालुकाध्यक्ष समाधान केवटे, सरचिटणीस विकास मनवर, सहसरचिटणीस पुरुषोत्तम सोडगीर,संघटक रवी शिंगणकर सदस्य बाळासाहेब ढोले तसेच ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.