
संगमेश्वर येथे रंगणार तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
संगमेश्वर तालुक्यातील अचानक मित्र मंडळ कोळंबे आंबेकरवाडी आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा संगमेश्वर – रत्नागिरी तालुका एक ग्रामपंचायत मर्यादित होणार असुन या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा दिनांक २४ आणि २५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६. ३० वाजल्यापासून खेळविण्यात येणार आहे.
या स्पर्धेची प्रवेश शुल्क ६०० रुपये असुन प्रथम – द्वितीय – तृतीय पारितोषिक विजेत्या संघास रोख रक्कम आणि आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कबड्डी खेळाडूंना जागतिक मंचावर त्यांची प्रतिमा आणि क्षमता दाखवण्याची अप्रतिम संधी मिळावी म्हणून ही स्पर्धा भरवण्यात आली असल्याचे मंडळाने सांगून सहभागी संघांचे कौतुक केले आहे.
सदर स्पर्धा ही अचानक मित्र मंडळ कोळंबे आंबेकरवाडी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी या ठिकाणी होणार असुन अधिक माहितीसाठी संदेश चव्हाण 9075287709, sagar 7020480497, मयूर 9372361106, जयेश 9309208641 या नंबरवर संपर्क करावा.