
ऑटोची ऑटोला धडक शाळकरी विद्यार्थी जागीच ठार
(पुसद उमरखेड रोड वरिल घटना )
पुसद तालूका प्रतिनिधी
पुसद : आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ भिषण अपघात झाला यात सौरव भिका राठोड वय 13 वर्ष राहणार दहिवड बु हा आसेगांवकर शाळेचा वर्ग 7वीचा विद्यार्थी जागीच ठार झाला हा विद्यार्थी गावातील ऑटोमध्ये सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाला असता गावातील बरेच । विद्यार्थी या ऑटोमध्ये होते तेवढयात साईबाबा मंदिरा जवळ अचानक ऑटोसमोर कुत्रा आडवा आल्याने ऑटोवाल्याने ब्रेक लावले असता पाठीमागून विद्यार्थ्याचा ऑटो समोरील ऑटोला जबर धडक दिली यात सौरव चा जागीच मुत्यु झाला तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले सौरव चा मुत्यदेह पुढील उत्तरीय तपासणी (PM) साठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला गावातील नागरिकांना माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली असून नातेवाईकांनी टाहो फोडला पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करित असून दोन्ही ऑटो त्यांनी ताब्यात घेतले आहे