माननीय खासदार संजय देशमुख यांचे उपस्थितीत आदिवासी समाजाची विकासात्मक बाबी संदर्भात पुसद येथे सहविचार सभा चे आयोजन.
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे सर्वांगीण विकासाचे व त्यांच्या गावातील,वाड्यातील समस्या बाबत. माननीय खासदार संजय देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत पुसद येथे दिनांक 18 फेब्रुवारी 2025 मंगळवार रोजी *नवीन पंचायत समिती सभागृह
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस रोड पुसद येथे सकाळी 11:30 वाजता. ठेवण्यात आली आहे.
तरी या आदिवासी सहविचार सभेमध्ये पुसद विधानसभा मतदार संघातील असलेल्या गावाकरिता भरून निधीमधून गाव वाड्यामधील सार्वजनिक सुविधांची कामे तसेच केंद्र शासनातील आदिवासीचे सर्वांगीण विकासात्मक उपाययोजना बाबत,चर्चा करण्यात येईल.
सदर बैठकीला आदिवासी विकास विभागाचे पुसद प्रकल्प अधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून,
या बैठकीला पुसद विधानसभेमधील आदिवासी तरुण-तरुणी, आदिवासी समाजातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आजी माझी जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच उद्योग क्षेत्राकरिता इच्छुक आदिवासी तरुण-तरुणींनी, आदिवासी बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे.
असे आव्हान
रंगराव काळे
माजी शिक्षण अधिकारी, तथा जिल्हा समन्वयक
(शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे),
व अरुण पूलाते स्वीय सहाय्यक यांनी कळविले आहे.