HomeUncategorizedघरा समोरून दुचाकीचे टायर व मॅकव्हिल चोरी

घरा समोरून दुचाकीचे टायर व मॅकव्हिल चोरी

घरा समोरून दुचाकीचे टायर व मॅकव्हिल चोरी

अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद :- जवळच असलेल्या केदारेश्वर नगर धनकेश्वर मंदिराच्या बाजूला फिर्यादी भगवान श्रीकृष्ण भोरकडे हे राहत असून पुसद पंचायत समिती कनिष्ठ लिपिक या पदावर आहेत दररोज त्या दुचाकीने येणे जाणे करतात दिनांक २२ फेबु २०२५ रोजी चे रात्री ९ वाजता सुमारास त्यांनी सिनेमा पाहुन घरी आले व दुचाकी घराचे कंम्पाऊंड मध्ये लावून घरी झोपी गेले सकाळी २३ फेब्रु २५ चे सकाळी ६ः३० ते घरातून बाहेर आले असता त्यांनी पाहिले तर त्यांच्या दुचाकी एम एच २९ झेड ८९०६ हिरो होंडा सिडी डिलक्स लाल रंग चे दोन्ही टायर मॅकव्हिल किंमत अंदाजे ४५०० रुपये दिसून आले नाही त्यांनी शेजारी विचारपूस केली व इतरत्र शोध घेतला असता मिळून आले नाही फिर्यादी ने वसंत नगर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंद केली आहे अज्ञात इसमा विरुद्ध वसंत नगर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ चे कलम ३०३ (2) नुसार गुन्हा नोंद झाला आहे

RELATED ARTICLES

Most Popular