
पुसद पंचायत समिती मार्फत
पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
माळपठार भागात आता पासूनच भिषण पाणी टंचाई झाली असून
तालुक्याला पाणी टंचाई जाणवत आहे. त्यात तीन गावांना आजपासून टँकरद्वारे पाणी पुरविणे सुरु झाले आहे. तर सावरगांव गोरे येथे सुध्दा टँकरद्वारे पाणी करण्यासाठी तहसिलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
दरम्यान या वर्षी होणाऱ्या भीषण पाणी टंचाईसाठी उपाययोजना करण्यासाठी ८ मार्च रोजी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्रवाल मंगल कार्यालयात आढावा बैठकीचे बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक
व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
बुटी, वडसद व रामपूरनगरला आजपासून टँकर सुरु
उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते तालुक्यातील होणाऱ्या टंचाईवर पाणी
उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडुन पाणी टंचाईचा कृती आराखडा मंजूर करुन घेण्यात आला आहे. तालुक्यातील बुटी, वडसद व रामपूरनगर येथे मार्च महिन्यातच जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही व जनावरांसाठीही मिळत नाही. त्यामुळे या तिन्ही गावांना ७ मार्च पासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे
तर सावरगांव गोरे येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी तहसिलदार महादेव जोरावर यांच्याकडे मंजुरातीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
यावर्षी पुसद तालुक्यात भीषण पाणी टंचाई ची शक्यता पाहता प्रशासन त्यावर उपाययोजना करण्यासाठी सज्ज असल्याचे गटविकास अधिकारी संजय राठोड सांगितले
तसेच शेंबाळपिंपरी येथील दरवर्षी च पाणी टंचाई होत असून तेथील सरपंच महल्ले सर यांनी त्यांचा पाणी टंचाई वरील प्रश्न मांडला जलजीवन मिशन चे काम वेळेत होत नसून नागरिकांना पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे