HomeUncategorizedहिवरा( संगम) जवळ एसटी बस व ट्रकच्या विचित्र अपघातात: एक जख

हिवरा( संगम) जवळ एसटी बस व ट्रकच्या विचित्र अपघातात: एक जख

हिवरा( संगम) जवळ एसटी बस व ट्रकच्या विचित्र अपघातात: एक जखमी!

महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) जवळ दुपारच्या दरम्यान झालेल्या अपघातात महामंडळाची एसटी बस आणि मालवाहतूक ट्रकची धडक बसल्याने अपघाताची घटना घडली.

काल एसटी महामंडळाची अहमदपूर आगाराची नागपूरकडे जाणारी एसटी बस क्र. एम एच २० बी.ई./ २३७७ व व त्याच दिशेने जाणारा ट्रक क्र. एम.एच.२९/ टी.१६०७ यांचा ट्रकच्या चालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्याने एसटी बस ट्रकच्या मागे धडकली. एसटी बस चालकाने प्रसंग सावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. बस मध्येअनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र पंढरीनाथ भुजंगराव गायकवाड मु.पो. फटावळ ता. कंधार जी. नांदेड या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली. एसटी महामंडळाच्या बसचा समोरील काच फुटल्या गेल्याने महामंडळ गाडीचे नुकसान झाले.तर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला होता. हिवरा (संगम) येथील जागृत युवक संदीप कदम यांनी कोसदणी महामार्ग पोलिसांना तत्काळ अपघाताची माहिती दिली. येथील मदत केंद्राचे महामार्ग पोलीस कर्मचारी जय जाधव, माधव अत्राम, सुभाष नागदिवे, चालक आशिष डेहनकर यांनी ॲम्बुलन्स सह येऊन जखमीला पुढील उपचारासाठी महागाव येथे पाठवले. वृत्त लिहीपर्यंत वाहनावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू होती.

RELATED ARTICLES

Most Popular