
होळी पौर्णिमेच्या मागील रहस्य!
होळी पौर्णिमा हा सण भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
विशेष करून महाराष्ट्राच्या कोकण भागात फार मोठ्या प्रमाणावर विविध पध्दतीने साजरा केला जातो.
होळीच्या पौर्णिमेच्या सणाची थोडक्यात माहिती जाणून घेऊया होळी फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.हिला हुताशनी पौर्णिमा असंही म्हणतात.
होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय आणि भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी सामायिक केलेल्या स्वर्गीय प्रेमाचा उत्सव आहे.वंसत ॠतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा सन्मान करण्यासाठी हा कापणी उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो. हिन्दू पौराणिक कथांनुसार राधा ही अत्यंत गोरी होती.कृष्ण हा गडद रंगाचा होता.त्यांच्या त्वचेच्या वेगवेगळ्या टोनमुळे राधा आपल्याला स्विकारेल
की नाही.याची चिंता कृष्णाला अनेक वेळा सतावत होती.असे.आणि त्याने
आई यशोदा कडे तक्रार केली.
यशोदाने एकदा गंमतीने सुचवले होते.
कृष्णाने कोणतेही मतभेद लपविण्यासाठी राधाच्या चेहऱ्याला वेगळा रंग द्यावा.कृष्णाने आईच्या सल्ल्याप्रमाणे केले.आणि राधाच्या चेहऱ्यावर डाग लावण्यासाठी गुलालाचा वापर केला.आणि अशा प्रकारे होळीच्या उत्सवाला प्रारंभ झाला.
होळी या सणाची आणखी एक अख्यायिका आहे
राजा हिरण्यकश्यपू भगवान विष्णूचे अनुयायी असलेला त्यांचा मुलगा प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका या राक्षसाची कथा सांगते. भारतीय पौराणिक कथांनुसार हिरण्यकश्यपूला
एक वरदान देण्यात आले होते.ज्या मुळे मनुष्य आणि प्राणी दोघांनाही त्याचा वध करण्यापासून रोखले गेले.म्हणुन त्याने त्यांना त्यांची पूजा करायला लावली.परंतू हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाला मुलगा भगवान विष्णूचा अनुयायी बनून त्याची पूजा करण्यास नकार दिल्यानंतर आगीपासून स्वतःचे रक्षण
करण्यासाठी चितेवर बसून स्वतःला वस्त्राने झाकून आपल्या मुलाला ठार
मारण्यास सांगितले.पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादाने भगवान विष्णूची प्रार्थना केली.त्यांनी होलिकाचे वस्त्र वाहून नेणारा वाऱ्याची झोत आपल्याकडे पाठवून प्रतिसाद दिला.म्हणून होळीच्या आदल्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याच्या निमित्ताने होळी उत्सव साजरा केला जातो.
कांहीं भागात घनदाट प्रमाणात जंगल आहेत.त्या भागातील सर्व गावकरी एकत्र येऊन जंगलात जातात मोठमोठी उंच झाडे तोडून वाजत गाजत गावकरी घेऊन येतात.होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीला आंब्याची पाने बांधली जातात.नंतर मोठ्या दोरखंडाच्या सहायाने चारी दिशांना बांधून होळी उभी करतात.कांही भागात लहान मुलं टिमकी वाजवतात.सर्वच भागात एक सारख्याच पद्धती दिसून येत नाहीत.प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पध्दतीने पुजा अर्चा करीत असतात.नैवद्य दाखवताना होळीच्या अग्नीत पोळी टाकतात, तूप ही टाकतात.कांही भागात चोरुन लाकड गोवऱ्या जमा केली जातात.नंतर ती जाळतात.ज्या त्या भागातील रुढी पंरमपरेनुसार कृती केली जाते.
पुर्वी समाज संपूर्ण अशिक्षित होता.फारशी शैक्षणिक किंवा वैज्ञानिक प्रगती झालेली नव्हती. दैविक शक्तीच्या किंवा दैववादी बनून अंधश्रद्धेच्या मानसिक अवस्थेत जीवन जगत होती.त्यामुळे त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून समाज वागत होता.
आता आपण एक विसाव्या शतकात विज्ञान युगात जीवन जगत असतांना विवेकवादी विचारांनी प्रभावित होऊन बदलत्या परिस्थिती नुसार आपण आपल्या कालबाह्य झालेल्या रुढी परंपरेत बद्दल घडवून आणल्या पाहिजेत.आणि त्या आणण्यासाठी प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी विचार केला पाहिजे.
उत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्व नागरिकांची जबाबदारी आहे.आणि ही काळाची गरज आहे.पुर्वी संतांनी प्रबोधनातून परिवर्तन घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे. पृथ्वीवर जेवढे जिवंत प्राणी आहेत.ते सर्व हवेतील प्राणवायू शोषून घेऊन कार्बन डायॉक्साईड बाहेर सोडतात.आणि तो सोडलेला कार्बन डायॉक्साईड वायु निसर्गातील वनस्पती स्वतः शोषून घेऊन परत सजीवांच्यासाठी प्राणवायूचा पुरवठा सातत्याने करीत असतात.आणि ती अशुध्द हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वादळ वाऱ्याच्या सहायाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे कार्य करीत असतात.निसर्ग जमिनीची धुप थांबवून संपूर्ण पर्यावरणाचे रक्षण करीत असतो. यांचा आपण एकाग्र होऊन विचार केला पाहिजे.
पृथ्वीवरील प्राणवायू पाच मिनिटे बंद झाला. तर या पृथ्वीवर एक तर सजीव जीवंत राहिलं का? आणि आपल्या ३३कोटी देवी देवतांच्या पैकी किती देव आपल्याला वाचवण्यासाठी प्राणवायूचा साठा उपलब्ध करून देतील!
याचा गांभीर्याने विचार करुन वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
याला पर्याय म्हणून गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन गावांमध्ये
स्वच्छता अभियान राबविण्यात यावे आणि संपूर्ण केरकचरा एकत्रित जमा करून जमा झालेल्या कचऱ्याची एकच होळी पेटवली जाऊन उत्सव साजरा केला जावा.म्हणजे संपूर्ण गाव स्वच्छ होऊन गावातील केर कचऱ्या पासून गाव स्वच्छ होईल. सामान्य जनतेला दुर्गंधी पासून आणि जीव जंतूंची निर्मिती पासून त्रास होणार नाही. गावात रोगराईला पसरणार नाही.वृक्ष तोड थांबविणे काळाची गरज आहे.
मुलांच्या हातात टिमक्या देवून आवाजाचे प्रदुषण करण्या ऐवजी मुलांचे भावी आयुष्य उज्ज्वल घडविण्यासाठी किंवा त्यांच्या
ज्ञानात भर टाकणारी छान, छान पुस्तके द्यावीत.यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल! आणि ज्येष्ठ नागरिकांना किंवा जन्माला आलेल्या लहान बालकांना, आजारी नागरिकांना होणारे आवाजाचे प्रदुषण थांबविण्यासाठी मदत होईल!
होळी पुजेच्या वेळी नैवेद्य दाखवताना काही भागातील भाविक पोळी आणि तूप टाकतात.त्या भाविकांचे प्रबोधन करुन त्या पोळ्या तरुणांनी एकत्रित जमा करून.उपाशीपोटी गोरगरीबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी देवून सत्कार्य होईल.
पुर्वी रंगपंचमीचा आंनद उत्सव साजरा करीत असताना नैसर्गिक रंगाचाच वापर केला जात होता.त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्वचेला हानी पोहोचू शकत नव्हती.तसेच रंगपंचमी खेळताना आपापल्या मित्रपरिवारात खेळत आंनद लुटत होते.येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जात होती.
सध्याची परिस्थिती पाहता रंगपंचमी खेळताना सर्वत्र नैसर्गिक रंगाच्या ऐवजी रासायनिक रंगांचा सरास वापर केला जात असल्याने त्वचेवर रंगाचे
दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत.तसेच अनोळखी व्यक्तींना काही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. तेंव्हा त्या रंगपंचमीचा प्रवाशांना हाकनाक त्रास होतो.तेंव्हा रंगपंचमीचा आंनद लुटत असताना इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
कांही भागात रस्तावर मोठे लाकडी ओंडके टाकून किंवा दोरखंडाच्या सहा प्रत्येक गावात गांवात रस्ता आडवून सक्तीने पैसाची मागणी सक्तीने केली जाते.आणि जमलेल्या पैशातून काही भागात संध्याकाळी पार्टी केल्या जात असलेल्या दिसून येतात.पैसे दिले नाही दिल्यास रंग मारला जातो. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वाहनांवर पिचकारिने किंवा रंगानी भरलेले फुगे फेकले जातात.त्यामुळे प्रवाशांना दुःखद प्रसंगी किंवा आजारी माणसाला दवाखान्यात जात असताना नाहक त्रास होत असतो.
रंगपंचमी खेळताना सर्वत्र नैसर्गिक रंगाचाच वापर सक्तीचा करणं आवश्यक आहे.
कांहीं भागात विविध प्रकारची सोंग घेवून गावा गावात जाऊन करमणूक केली जाते.सदरचा कार्यक्रम सिमग्या पासून पाडव्याच्या संणापर्यंत चाललेला असतो.त्या मुळे ग्रामीण भागातील लहान मोठ्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध होत असते.त्यातून नवीन कलाकार घडतं असतात.अशा कार्यक्रमातून पर्यावरणाचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टीकोन, विवेकवादी याचे महत्त्व प्रामुख्याने पटवून देवून समाज प्रबोधन केले पाहिजे.
कोणताही उत्सव साजरा करत असताना त्या मागील सत्य आणि असत्य यांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा केली पाहिजे.योग्य असेल ते स्वीकारावे.अयोग्य असेल ते सोडून द्यावे.
माणूस जीवनामध्ये नेहमी वैयक्तिक पातळीवर विवेकवादी होऊन चिकित्सा करत असल्याचे दिसून येतोय.ज्या वेळी तो बाजारामध्ये अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी जातो.त्यावेळी कोणत्याही वस्तूची खरेदी करताना महिला पुरुषांच्या पेक्षा जास्त चिकित्सक होऊन प्रत्येक वस्तूंची बारकाईने निरिक्षण करुन खरेदी करीत असतात.उदा.भाजीची पेंडी, धान्य, कपडे, भांडी, अगदी पारखून घेतल्या जातात.पण त्याच व्यक्ती जीवनातील कालबाह्य झालेल्या रुढी पंरमपरांचा वैचारिक कशोटीवर तपासून न घेता
स्विकारण्याची त्यांची मानसिक अवस्था दिसून येते.या मुळे वैज्ञानिक दृष्टीकोनातून तपासून घेण्याची क्षमता नष्ट होवून अंधश्रद्धेचे बळी पडत आहेत.
शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत घेऊन संशोधन करून तयार केलेली यंत्र सामुग्री, विविध उपकरणे, तंत्रज्ञान यांत्रिकीकरण टेक्नॉलॉजीचा .
सर्वजण यथोचित उपयोग करून घेतात.अंधश्रध्देच्या बाजारातून विवेकवादी मार्गाने विज्ञानवादी मैदानात येऊन मुक्तछंद जगण्याची मानसिकता दिसत नाही.
होळी पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटविण्याचा मुख्य उद्देश हा आहे.की
जीवनात माणूस म्हणून जगण्यासाठी जेवढ्या वाईट गोष्टी,वाईट कृत्य,वाईट
विचार, अत्याचार, स्वैराचार, इत्यादी होळीच्या अग्नीत जाळून राख करायचं आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून माणूस म्हणून एकमेकांच्या बरोबर गुण्यागोविंदाने जगणं होय.
पंरतू दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुन, दरोडे, बलात्कार, अत्याचार, हाणामारी, भोसकाभोसकी,हे पाहून 33 कोटी देवीदेवतांचे सानिध्यात राहून. राष्ट्रीय थोर समाजसुधारकांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन आदर्श व्यक्ती होण्याच्या ऐवजी राक्षसी प्रवृत्तीने प्रेरित होवून सैताना सारखा वागतो आहेस. तू जन्माला येताना भाडोत्री म्हणून पृथ्वीवर आला आहेस याची नेहमी माणूस म्हणून जाणीव ठेवावी!
देशमुख पी. आर.
9921111955