HomeUncategorizedअ.भा.तांडा सुधार समिती आणिमाजी विद्यार्थ्यांच्या वतीनेप्रा.विलास भवरे यांचा भावपूर्ण सेवापूर्ती सत्कार समारंभ...

अ.भा.तांडा सुधार समिती आणिमाजी विद्यार्थ्यांच्या वतीनेप्रा.विलास भवरे यांचा भावपूर्ण सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

अ.भा.तांडा सुधार समिती आणि
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने
प्रा.विलास भवरे यांचा भावपूर्ण सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद : येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयातील मराठी विभागाचे ज्येष्ठ व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक विलास भवरे हे नियत वयोमानानुसार माहे फेब्रुवारी अखेर सेवानिवृत्त होताहेत. त्याप्रित्यर्थ अखिल भारतीय तांडा सुधार समिती आणि माजी विद्यार्थी मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार समारंभ माजी आमदार,तथा नेते ऍड.निलय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली भावपूर्ण वातावरणात डहाणूकर सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृषिभूषण दीपक आसेगांवकर,अमृत पॅटर्नचे प्रमुख दिनेश देशमुख,सुप्रसिद्ध कवयित्री वऱ्हाड कन्या मधुराणी बनसोड, समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड,प्राचार्य डॉ. अनिल मुडे,महासचिव नामा बंजारा,सुप्रसिद्ध साहित्यिक प्रशांत वंजारे, प्रा.डॉ. अनिल काळबांडे,विश्वास भवरे,सरपंच वसंत पवार हे उपस्थित होते.एखाद्या सेवाभावी संस्थेने आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन घेतलेला हा शैक्षणिक क्षेत्रातील बहुदा पहिलाच उपक्रम असावा.
याप्रसंगी निलय नाईक, दीपक आसेगांवकर या मान्यवरांच्या हस्ते प्रा.विलास भवरे आणि त्यांची पत्नी सुनंदा भवरे यांचा मानपत्र,सन्मानचिन्ह व सन्मान वस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन प्रा.डॉ. अनिता कांबळे यांनी केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगताद्वारे प्रा.भवरे यांनी केलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रमुख अतिथी दीपक आसेगांवकर यांनी प्रा.भवरे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना सुभेच्छा दिल्या. प्रा.भवरे हे माझे जीवलग मित्र आहेत. या मित्रप्रेमापोटी समारंभाला हजर राहण्याची संधी मिळाली असे सांगत,समाजात असे प्राध्यापक निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यानिमित्ताने सेवानिवृत्त होणारे विज्ञान विभागाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.प्रवीण हमजादे यांचा तसेच फुलसिंग नाईक महाविद्यालयातील पीएच.डी.प्राप्त प्राध्यापक उल्हास चव्हाण, अनिता कांबळे, गोपाल शेळकीकर,प्रियंका गायकवाड, आनंद वडवळे,वसंत कांबळे,एस.एम.चव्हाण, दत्तात्रय पवार, अनिल दुधे,भूषण मनगटे,अमोल सपकाळ,विदुला कटकमवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, सुप्रसिद्ध कथालेखक तथा संत सेवालाल महाराज यांचे जीवन चरित्र लिहिणारे लेखक प्रा.डॉ. विजय जाधव,नामा बंजारा यांची समयोचित भाषणे झाली.वसंत सुधा स्टडी सर्कलच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि अभ्यासक्रमपूरक पुस्तके मा.निलय नाईक,दीपक आसेगांवकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.या कार्यक्रमाला मिडियाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर सिद्धार्थ कदम,विनोद कांबळे, अनिल पवार प्रा.डॉ. वंदना पुंडकर,प्रा.सुरेश पुंडकर, प्रा.दादाराव अगमे,प्रेमकुमार ठोके, गणेश वाठोरे, संतोष चव्हाण,सूर्यकांत कांबळे, दादाराव जाधव,कृषी सहाय्यक विनोद राठोड, प्रा.मधुकर बनसोड,आनंदराव रणखांब यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी विद्यार्थी, मित्रपरिवार,नातेवाईक,प्रतिष्ठित मान्यवर आणि बाहेरगावाहून आलेल्या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. शशी पवार यांनी केले तर यशस्वीतेसाठी,प्रा.डॉ. ताराचंद राठोड, प्रा.विजय राठोड,प्रा.डॉ. अनिता कांबळे, प्रा.अभिषेक शिरमवार, प्रबंधक उमेश चव्हाण,गजानन राठोड, विजय सेंगर,बापुराव कांबळे, रमेश रत्ने, चिंतामण शिंदे,दीपक पाचंगे, आदित्य जाधव यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular