
.कालकथित मोतीराम (बापू) काशीराम ढोले यांचा पुण्यानुमोदन, जलदान विधी कार्यक्रम संपन्न!
“ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची सांत्वन पर भेट”.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
कालकथित मोतीराम (बापू)काशीराम ढोले यांचे निधन दिनांक 15 मार्च 2025 रोजी झाले त्यांचा जलदान व पुण्यानुमोदन विधी कार्यक्रम दिनांक 17 मार्च 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभेचे चौरे सर यांच्या हस्ते संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असेकी
लक्ष्मी नगर अर्थात श्रावस्ती नगर येथील रहिवासी ज्येष्ठ बौद्ध उपासक मोतीराम(बापू) काशीराम ढोले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते 80 वर्षाचे जीवन जगले उपासक
बाबाराव ढोले,रिपब्लिकन वार्ता, दैनिक सुवर्ण महाराष्ट्र चे पत्रकार राजेश ढोले, ऑल इंडिया पँथर सेनेचे दादाराव ढोले यांचे ते वडील होते.
जुन्या आंबेडकरी चळवळीचे खंदे नेतृत्व, निष्ठावंत बौद्ध धम्माचा गाडा शेवटपर्यंत वाहुन घेणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या क्रांतीच्या निळ्या ध्वजाचा स्वाभिमान जागृत ठेवून त्यांनी आपले जीवन शेवटपर्यंत व्यथित केले.
पुण्यानुमोदन व जलदान विधी कार्यक्रमास, दीपकभाई केदार यांनी सांत्वन पर भेट देऊन जुन्या आंबेडकरी नेतृत्वाच्या मोतीराम (बापू) ढोले यांना अभिवादन करून ढोले कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची प्रार्थना करीत आपणही दुःखात सामील असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी, ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक भाई केदार,विनोद भाई गोळे, बाळासाहेब सेंडगे, जितेशभाई जगताप,
डॉ.दीपक ढोले, सीआयडी मुंबई राकेश माने,सिद्धांत कोल्हे, नरेंद्र पाटील सर, धम्मभूषण भीमराव कांबळे,बाबाराव उबाळे मिलिंद जाधव, किशोर कांबळे,शीतल कुमार वानखेडे,भोलेनाथ कांबळे,शरद ढेबरे बुधरत्न भालेराव, प्रफुल्ल भालेराव, शरद भगत,भीमराव दिघाडे, मधुकर खिल्लारे,चौरे खडसे, संतोष गायकवाड
इत्यादी कार्यकर्ता धम्म बांधव उपस्थित होते.