HomeUncategorizedकोमसाप तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेत स्वानंदी जोगळेकर, तन्वी...

कोमसाप तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेत स्वानंदी जोगळेकर, तन्वी सुर्वे, माही वनकर प्रथम

कोमसाप तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धेत स्वानंदी जोगळेकर, तन्वी सुर्वे, माही वनकर प्रथम

रत्नागिरी: संदीप बलेकर
कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हा आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न झाली. शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुल्या गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून उत्स्फूर्त विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. प्राप्त निबंधाचे परिक्षण साहित्यिक अरुण मोर्ये, प्रा. आनंद शेलार व विलास राणे यांनी केले. सदर स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन २७ फैब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी रत्नागिरी येथील वि.दा. सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात गौरविण्यात आले. या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे–
शालेय गट
प्रथम– माही गिरीश वनकर, कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली.
द्वितीय — अनुष्का राकेश घडशी, शिर्के हायस्कूल रत्नागिरी.
तृतीय — श्रावणी भुजंग पाटील, राधा पुरूषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालय कुर्धे.
उत्तेजनार्थ १ — श्रृती महेश कोळंबेकर,डि. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल पाली .
उत्तेजनार्थ २ — रिया नितेश महाकाळ,न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे.

महाविद्यालयीन गट
प्रथम — तन्वी चंद्रकांत सुर्वे, मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज पाली.
द्वितीय — त्रिवेणी सुभाष थुळ,दि यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेज रत्नागिरी.
तृतीय — सेजल भार्गव मेस्त्री, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी.
उत्तेजनार्थ १ — निशा श्रीपाल जाधव फुणगूस, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साठवली , संगमेश्वर.
उत्तेजनार्थ २ — प्रार्थना संतोष सुर्वे,पैसा फंड हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, संगमेश्वर.

खुला गट
प्रथम — स्वानंदी स्वरूप जोगळेकर, देवरूख.
द्वितीय — सुप्रिया माधव अंकलगे वाटद, खंडाळा.
तृतीय — निनाद नंदकुमार चिंदरकर, रत्नागिरी
उत्तेजनार्थ १ — अविनाश प्रकाश लहासे,रायगड
उत्तेजनार्थ २ — संतोष भिकाजी सारंग, गावडे आंबेरे.
सर्व विजेत्यांचे सन्मान रत्नागिरी जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, शिक्षण विभागाच्या शिरभाते मॅडम, हिरवे मॅडम, केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष आबा पाटील, कोमसाप जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, कोमसापचे केंद्रीय सचिव माधव अंकलगे, कोमसाप युवाशक्ती दक्षिण कोकण प्रमुख अरुण मोर्ये, राजेश गोसावी, विलास राणे, गोपाळेसर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular