
धुळे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश मोहिते
ग्रामपंचायत मळगाव सरपंच किरण बागुल आणि विजय ज्ञानेश आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत )पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ” मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ” या कार्यक्रमाच्या आयोजन केलं होतं. “आपले गाव आपले स्कीम ” या उद्देशाने मळगाव ग्रामपंचायत परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना योजनेसाठी फार्म भरून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी माननीय श्री रणधीर साहेब शाखा अभियंता कुडाशी, आणि कमलास्कर साहेब शाखा अभियंता पिंपळनेर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात माननीय रणधीर साहेब आणि माननीय कमलास्कर साहेब यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
माननीय रणधीर साहेब यांनी शेतकरी बांधवांना विद्युत वितरण कंपनी यांच्या बद्दल मार्गदर्शन केले. आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत चा प्रॉब्लेम जाणवते. विद्युत कंपनीवर जास्त लोड आल्यामुळे वीज पुरवठा वेळेवर येत नाही. किंवा मध्येच वीज खंडित करून विद्युत पोल वायर तुटते ते दुरुस्त करण्यास पाच-सहा तास जात असता. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाला पाणी भरायला अडचण येत असतो. त्यासाठी जास्त जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ” मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ” ऑनलाइन फॉर्म भरून सोलर पंप बसून घ्यावे. असे मार्गदर्शन केले.
कमलास्कर साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही ऑनलाईन फार्म भरायला जाणार तेव्हा आवश्यक कागदपत्र जसं की आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुकची झेरॉक्स, जातीचा दाखला, दोन पासपोर्ट साईज फोटो, असं सर्व कागदपत्रे घेऊन जावे. त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि आपला फॉर्म सुरळीत भरला जाईल. अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आले
या कार्यक्रमासाठी माननीय राजपूत नाना सर्कल कुडाशी, माननीय निर्मला शिंदे मॅडम तलाठी मळगाव, मा.भोये आप्पा तलाठी खरगाव, माननीय रतिलाल पवार ग्रामविकास अधिकारी मळगाव, मा. गांगुर्डे नाना लाईट मन , मा. संदीप पाटील लाईट मन, यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित ” मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ” हा कार्यक्रम घेण्यासाठी मळगाव ग्रामपंचायत परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना मळगाव ग्रामपंचायत सरपंच किरण बागूल यांच्या मार्फत ला स्पीकर लावून. जनजागृती करण्यात आली. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी विजय बागुल तालुका प्रतिनिधी यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फार्म भरून घेतले या कार्यक्रमात एकूण 70 ते 75 शेतकरी उपस्थित होते
मोलाचे सहकार्य, ज्योतीराम भवरे, अमित भवरे, रतन कुवर, विनायक कुवर, गोमा देवरे,राजू कुवर, भिकन अहिरे, कल्पना बागुल, एस्तर कुवर, अनिल भवरे, हुरजी कुवर, कांतीलाल सोनवणे, सापटू भिल, मंगलदास वळवी, जिवणजी वळवी , सुकलाल गांगुर्डे , सोन्या कुवर, आधी शेतकरी उपस्थित होते.मळगाव ग्रामपंचायत येथील तरुण संघ, शेतकरी बंधू, वडीलधारी मंडळी, उपस्थित होते.