HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची मुद्दतवाढ देण्यात यावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची मुद्दतवाढ देण्यात यावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची मुद्दतवाढ देण्यात यावी

भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे समाज कल्याण विभागाला निवेदन

तालूका प्रतिनिधी

सन 2024-25 या शैक्षणिक
वर्षातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी तसेचं टेक्निकल बाबींत लवकरचं दुरुस्ती करावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे उपविभागीय अधिकारी पुसद मार्फत समाज कल्याण विभागाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार वर्ग 11वी आणि 12वी व त्या नंतरच्या उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही अशा सर्वच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येतो मात्र सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हि प्रक्रिया वेळखाऊ आणि मनस्ताप आणणारी आहे. त्यामुळे बरेचं विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित आहेत. तसेचं वसतिगृहांची संख्या कमी असून स्वाधार योजना व तिचे मिळणारे भत्ते सुध्दा कमी आहेत. यासाठी रक्कम वाढवून देण्यात यावी व रक्कम लवकरचं विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी जेणे करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत होईल, निवासी वसतिगृहांची संख्या वाढविण्यात यावी व पटसंख्या सुध्दा वाढवून द्यावी.
स्वाधार योजना फक्त कागदावर न राहता सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाने निवेदनात केली.
मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देत असताना भारतीय विद्यार्थी मोर्चाचे रोहित कांबळे, विकास गडधने, शिवाजी मळघने, सुनील भोने, गणपत गव्हाळे, जयशील कांबळे, सुरज पांडे, सुदर्शन दोडके, सुदर्शन चव्हाण, जीवक पंडीत आणि इतरही विद्यार्थी युवा उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular