
दोन चारचाकी ची समोरासमोर भिषण धडक
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद : पुसद शहरासह तालुक्यात अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे कधी दुचाकी व चारचाकीचा समोरासमोर भीषण अपघात तर कधी चारचाकीलाच चारचकीचा भीषण अपघात अशा अपघाताच्या घटना दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने बघायला मिळत आहे. दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला सुदैवाने यातुन कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे परंतु या घटनेमध्ये एका चारचाकी मधील युवकाचे डोके फुटल्याची माहिती समोर आलेली आहे सविस्तर बातमी अशी कि दिनांक 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या भाटंबा फाट्याजवळ मारोती सुजुकी विटारा थ्रीचा चारचाकी वाहन क्रमांक MH 27 BV 1722 व मारोती सुजुकी डिझायर चारचाकी वाहन क्रमांक MH 04 EV 0056 या दोन चारचाकी वाहनांची भीषण धडक झाली धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा समोरील भाग चकनाचुर झाला मारोती सुजुकी विटारा थ्री चा चारचाकी क्रमांक MH 27BV 1722 यामधील एका व्यक्तीचे डोके फुटले अपघात घडताच वेळीच गाडीमधील एअर बॅग उघडल्याने मोठा अपघात तळला या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन चारचाकी वाहनांच्या झालेल्या अपघातामुळे मात्र त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघणाऱ्यांची गर्दी निर्माण झाली होती.