HomeUncategorizedधनोडा येथे टाकण्यात आलेली महागाव पोलिसांची धाड संशयास्पद!

धनोडा येथे टाकण्यात आलेली महागाव पोलिसांची धाड संशयास्पद!

धनोडा येथे टाकण्यात आलेली महागाव पोलिसांची धाड संशयास्पद!

धनोडा पैनगंगा नदीच्या तीरावर चिंचेच्या झाडाजवळ बुढेबाबा परिसरात मोठ्या प्रमाणात तीनपानी जुगार आणि मटक्याचे काउंटर चालू असल्याची माहिती मिळाल्याने महागाव पोलिसांनी सोमवारी पाच वाजताच्या दरम्यान धाड टाकली, परंतु मटका बहादर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची जोरदार चर्चा धनोडा परिसरात ऐकायला मिळत आहे.

दि. 10 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान धनोडा पैनगंगा नदी तीरावरील चिंचेच्या झाडाजवळील बुढ्ढेबाबा मंदिरालगत प्रचंड प्रमाणात एक्का बादशहा जुगार भरविला जात असल्याची महागाव पोलिसांना भनक लागली. या अड्ड्यावर छापा घालून मटका बहादरांना पकडण्याची महागाव पोलीसांची कार्यवाही सपशेल फेल झाली. मटका बहादर महागाव पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी झाले असल्याची धनोडा येथे चर्चा रंगत आहे. धनोडा येथील मटके बहाद्दर पळून गेले की, सोडण्यात आले ? पोलिसांच्या भूमिकेबद्दल नागरिकांतून उलट सुलट चर्चेला उद्यान आले आहे. धनोडा येथे अनेक ठिकाणी मटका काउंटर राजरोसपणे चालविले जात आहे. या मटक्याचा एक संशयित खावाल पोलिसांच्या हाती लागून त्याला पोलीस गाडीत नेतांना अनेकांनी बघितल्याची चर्चा आहे. परंतु कार्यवाही मात्र काहीच करण्यात आली नसल्याने सांगण्यात येते. यामुळे महागाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास वाव मीळते. धनोडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एका बादशहा जुगार, चंगड खेळातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने येथे मराठवाड्यातूनही अनेक मटक्याचे शौकीन हजेरी लावत असल्याचे बोलल्या जाते. धनोडा पॉईंट अवैध देशी दारू विक्री प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अनेक वेळा कार्यवाहया झाल्या, तरीही या ठिकाणी सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याचे कळते. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान महागाव पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून धनोड्याच्या एका संशयित खावालास पोलीस गाडीमध्ये टाकून गावाबाहेर नेल्याच्या वृत्ताची चर्चा आहे. परंतु पोलिसांना कार्यवाही संबंधी विचारणा केली असता, या ठिकाणचे मटका बहाद्दर पळून गेल्याचे सांगण्यात येते. महागाव पोलीसांनी टाकलेली धाड संशयास्पद असल्याची धनोडा परिसरात जोरदार चर्चा रंगत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular