HomeUncategorizedधुळे जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांचे जिल्हा स्तरीय सुरक्षा आणी सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न*

धुळे जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांचे जिल्हा स्तरीय सुरक्षा आणी सुरक्षितता प्रशिक्षण संपन्न*

धुळे जिल्ह्या प्रतिनिधी

समाधान बैसाणे

“समग्र शिक्षा शिक्षण विभाग” अंतर्गत धुळे जिल्यातील ११५९ शाळेच्या मुख्याद्यापक व केंद्र प्रमुखांना सुरक्षा आणी सुरक्षितता प्रशिक्षण देण्यात येत आहे.
दिनांक 01 एप्रिल 2010 पासून राज्यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्याना सुरक्षित वातावरणात गुणवत्ता पूर्वक शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळा आणी परत घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, विद्यार्थ्यांवरील हिंसाचार, शाळा सुरक्षा, आपत्ती जोखीम कमी करणे, बाल संरक्षण, आरोग्य आणी स्वछता या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, श्रीमती. आर. विमला मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे व धुळे जिल्हा शिक्षणाधिकारी सौ.डॉ .किरण कुवर मॅडम (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी श्री.संजीव विभांडीक ( प्राथमिक ) यांच्या मार्गदर्शनाने व गेंदीलाल साळुंखे विस्तार अधिकारी समग्र शिक्षा अभियान धुळे यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.
या प्रशिक्षणासाठी अमरावती व नाशिक विभाग प्रमुख श्री. अजित धसाडे सर, धुळे जिल्हा समन्वयक श्री. विजय मधुकर नंदन सर, सौ रोहिणी नंदन तालुका समन्वय तसेच मुख्य प्रशिक्षक श्री. योगेश पाटील सर, श्री. जितेंद्र शिरसाठ सर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular