
धुळे जिल्ह्यातील व शहरातील डिजे चा कर्कश आवाजाचे प्रेशर मिड बंद करा —- सागर भाऊ मोहिते यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरुन विनंती करीतो की, धुळे जिल्ह्यातील डीजे चालक मालक यांना आपण सुचित करावे की, सध्या डीजे साऊंडचा आवाज खुपच कर्कश होत आहे. त्या मागचे कारण म्हणजे प्रेशर मिड स्पीकर हा प्रेशर मीड स्पीकरमुळे जनतेला कर्णदोष होऊ शकतो. व गेल्या वर्षी गणपती उत्सवात जास्त प्रमाणात पोलीसांना व लोकांवर कर्ण दोष होऊन ऐकू येण्याचे प्रॉब्लेम आले असून त्यामुळे डीजे साऊंड मधील नवीन स्पीकर आला आहे तो म्हणजे प्रेशर मिड हा एकाही डीजे मध्ये वाजू नये. ही दक्षता घेऊन आपण डीजे चालक, मालक यांची मिटींग घेऊन प्रेशर मीड बंद बाबत कारवाई करावी व यापुढे ज्या-ज्या डीजे मध्ये प्रेशर मीड आढळून आल्यास त्या डीजे वर कार्यवाही करावी. तसेच अतिशय कर्कश असा आवाज आणि त्यामुळे डीजे धारकांत आवाजाची होणारी स्पर्धा यामुळे सामान्य नागरिकांना जीवघेणे ठरत आहे. तसेच या स्पर्धेमुळे भविष्यात डीजे धारकांत व डीजे लावलेल्या समोरील पार्टीमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे या कर्णकर्कश आवाजावर व आवाजामुळे होणाऱ्या स्पर्धेवर वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे. तसेच आरोग्यासह सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या डिजेला आवाजासाठी शासनाने नियम केले आहेत. सारे नियम धाब्यावर बसवून विवाहसह इतर समारंभासाठी डीजेच्या अमर्याद आवाजाने नागरिकांच्या कानठळ्या बसत आहेत. प्रशासन मात्र कोणतीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची पोलीस प्रशासनाने अंमलबजावणी करण्याची गरज या प्रेशर मिडमुळे व डीजेचा मोठा आवाजामुळे झाली आहे. लहान मुले, जेष्ठ नागरिक, गरोदर स्त्रीया यांना या डीजेच्या कर्कश आवाजामुळे त्रास होतो.
सध्या लग्नसराईत सुरु आहे. वरातीमध्ये व इतर समारंभात कर्कश आवाजावर आपण आळा घालावा. प्रेशर मिड बंदी करावी, या स्पीकरमुळे वरील त्रास होत आहे. वरील सर्व प्रकारांमुळे डीजेवर बंदी येऊ शकते. आणि लहान साऊंड व डीजे व्यवसायावर याचा परिणाम होऊन उपासमारीची वेळ येऊ शकते म्हणून मी एक डीजे साऊंड व्यावसायिक
असून मी व्यवसाय वाचविण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
तरी आपण वरील सर्व बाबींवर आळा घालून आवाजाची मर्यादा संदर्भात मिटींग घेऊन प्रेशर मीड व मोठ्या कर्कश आवाजावर मर्यादा घालून डीजे धारकांना सुचित करावे. अन्यथा मी एक डीजे साऊंड व्यावसायिक तसेच ऑल इंडिया पँथर सेनेचा अध्यक्ष या नात्याने त्तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार याची नोंद घ्यावी.
धुळे जिल्हाध्यक्ष
सागर भाऊ मोहिते
दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नागसेन बागुल
महिला जिल्हा अध्यक्षा अनिताताई सोनवणे , विशाल वाघ
आनंद अमृतसागर, प्रशांत थोरात
आकाश घोडे, योगेश बैसाणे
प्रविण शिंदे , पुजा चव्हाण
निलेश इंदवे , संघरत्न गायकवाड
सुमित अहिरे, सिध्दार्थ वेंदे व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते