HomeUncategorizedधुळे शहरातील शासकीय विद्या निकेतन या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी मुलभूत सुविधा पासून...

धुळे शहरातील शासकीय विद्या निकेतन या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी मुलभूत सुविधा पासून वंचित आहेत.

धुळे शहरातील शासकीय विद्या निकेतन या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी मुलभूत सुविधा पासून वंचित आहेत. संस्थेच्या परिसरात अस्वच्छता, जेवणात गुणवत्ता नाही, विद्यार्थ्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची? असा सवाल रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख समाधान बैसाणे यांनी उपस्थित करत या शाळेच्या चौकशीची मागणी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय विद्या निकेतन या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी जो शासन निधी देतो, त्या निधीचे काय होते ? निधी कुठे वापरला जातो ? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेने उपस्थित केला आहे. संस्थेच्या वसतीगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 132 आहे. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर पाणी पितात परिसरातील पाण्याच्या विहीरीवर झाकण नसल्यामुळे झाडांचे सुकलेली पाने, पाल, सरडा, बेडूक पडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या संस्थेची जिल्हाधिकारी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

BYTE – समाधान बैसाणे, रिपब्लिकन सेना धुळे जिल्हाप्रमुख…

RELATED ARTICLES

Most Popular