HomeUncategorizedनमस्कार!आमच्या न्यूज पोर्टलवर आपले स्वागत आहे. तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करण्यासाठी...

नमस्कार!आमच्या न्यूज पोर्टलवर आपले स्वागत आहे. तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करण्यासाठी आमची डिजिटल व्यासपीठ हे एक उत्तम साधन आहे. आमचे पोर्टल हजारो वाचकांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे तुमच्या उत्पादनांची ब्रँड व्हिजिबिलिटी आणि विक्री वाढू शकते. आमच्या जाहिरात पॅकेजेसमध्ये बॅनर अॅड्स, स्पॉन्सर्ड आर्टिकल्स, सोशल मीडिया प्रमोशन्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.

तुमच्या ब्रँडला योग्य ते प्रेक्षक मिळवून देण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायाला गती देण्यासाठी, आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम जाहिरात योजना देऊ.
धन्यवाद!

मुख्य संपादक
प्रशांत खंदारे
9767478472

Previous article
Next article
🌸धम्मसेवक शिक्षण संस्था🌸डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित, पीपल्स एज्युकेशन मुंबई च्या नागसेन हायस्कूल प्रभात नगर नांदेड या शैक्षणिक संकुलात मी 24 जुलै 1987 रोजी रुजू झालो आणि 31 जुलै 2023 रोजी सेवानिवृत्त झालो. 37 वर्षे 11 दिवस हे अनुदानित 9 महिने 23 दिवस हे विनाअनुदानित म्हणजे 150 रु. (रु.एकशे पन्नास फक्त) मानधनावर अशी एकूण 37 वर्षे 10 महिने व 3 दिवस मी पीपल्स एज्युकेशन सोसाटीला सेवा दिली. या काळात मी मुळाव्याचे भन्तेजी ‘धम्मसेवक महाथेरो’ यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या भिक्खू संघाच्या सहवासात होतो त्यामुळे पूजाविधी हे या भिक्खू संघाच्या पद्धतीनेच शिकलो. 1991 हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष असल्याने मी माझ्या ‘नागसेन हायस्कूल’ च्या 45 विद्यार्थ्यांना घेऊन ‘खडकावरील अंकुर’ ही मुंबईच्या लेखिका मृण्मयी बारपांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाल जीवनावर आधारित लिहिलेली बालनाटिका बसवली होती. ती नाटिका नांदेड जिल्ह्यात खूप गाजली होती. तिचे अनेक प्रयोग नांदेड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात झाले होते. तीच नाटिका मी नांदेड जिल्हा कामगार मंडळाच्या जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत उतरवली होती व ती जिल्ह्यात प्रथम आली आणि मला दिग्दर्शनाचे जिल्हास्तरावर पहिले बक्षीस मिळाले. तेव्हा मी त्या नाटिकेची स्क्रिप्ट दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई च्या पत्त्यावर डायरेक्टर च्या नावाने पाठवली व ती सिलेक्ट झाली. व्ही. एच. भामरे साहेब हे त्यावेळी नाट्य विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या सहिचे पत्र माझ्या मुख्याध्यापकांच्या नावे आले व 5000रु.(रुपये पाच हजार फक्त) माधन मंजूर झाल्याचे त्यात नमूद केले होते. प्रत्यक्ष शुटींग झाल्यानंतर भामरे साहेबांनी ते मानधन 15000 रु. (रुपये पंधरा हजार) केले तो भाग वेगळा. माझी शाळा महाराष्ट्रात गाजली. 1992 ला नांदेड जिल्ह्यात ‘साक्षरता अभियान’ आले. माझा ‘शालेय गीतमंच’ तेव्हा आमच्या नांदेड जिल्ह्याच्या शिक्षण विभागात खूपच गाजत होता. नांदेडचे तेव्हाचे जिल्हाधिकारी डॉ. सुधीरकुमार गोयल हे ‘जिल्हा साक्षरता समिती’ चे अध्यक्ष होते. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी कळमकर साहेब व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी एम. आर. देशमुख सर होते. या दोघांनाही माझ्या गीतमंचाबद्दल माहित होते. वातावरण निर्मितीचा पहिला टप्पा शिक्षण विभागाकडे असल्याने ती जबाबदारी शिक्षण विभागाने माझ्यावर टाकली व मी जिल्ह्यातील विविध शाळांमधून 80 कलाजत्थे प्रशिक्षीत करून, जिल्ह्यात सर्वत्र फिरवून वातावरण निर्मिती चा पहिला टप्पा यशस्वी केला व आमचा जिल्हा 100% साक्षर झाला. त्यानंतर डी. पी. ई. पी. चा प्रोजेक्ट आला. त्यातही वातावरण निर्मिती माझ्याकडे होती. 1993-94 ला तत्कालीन उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या सुविद्य पत्नी उषा नारायणन यांच्या अध्यक्षतेखाली देशाचे 8 झोन पाडून भारत ज्ञानविज्ञान समितीने देशभरातून ‘समता-साक्षरता-एकात्मता’ या मुद्द्यांवर ‘महिला जागृती जत्था’ काढला होता. हा दीड महिन्याचा कार्यक्रम होता. झोन क्रं. 3 मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांचा समावेश होता. त्या झोनचा प्रमुख म्हणून डॉ. गोयल साहेबांनी माझ्या नावाची शिफारस केली होती. ह्या कार्यक्रमाचा समारोप ‘झाशी’ येथे झाला व आम्हा कलावंत कार्यकर्त्यांचा सन्मान ‘कॅप्टन लक्ष्मी’ यांच्या हस्ते झाला, हे सांगताना आज अंगावर काटा येतो. नंतर मी धम्मकार्यात झोकून द्यायचे ठरवले. 1995 ला नांदेडमधील अरुणोदय नगरात बुद्ध विहार बांधण्याच्या निमित्ताने ‘धम्मसेवक शिक्षण संस्था’ स्थापन केली. 1995 ते 2007 पर्यंत सलग 13 ‘बौद्ध धम्म परिषदा’ भरवल्या. पुढे भिक्खू संघाशी माझे मतभेद झाले. बौद्ध धम्म परिषदा बंद पडल्या. 2010 ला दोन दिवसीय ‘अखिल भारतीय आंबेडकरी जलसा परिषद’ व नंतर 2011 ला रिपब्लिकन सेना जॉईन केली. 2014 ला रिपब्लिकन सेना ही राजकीय पक्ष म्हणून सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी घोषित केली.आज कर्मधर्मसंयोगाने मुंबई व मुंबई परिसरात माझा वावर सुरू झाला. योगायोगाने पालघर जिल्ह्यातील ‘डहाणू’ या आदिवासी तालुक्यातील ‘गंजाड’ या आदिवासी पट्ट्यात वावरण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा एकदा धम्मसेवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘गंजाड लोकबिरादरी’ स्थापन करून आदिवासींच्या सेवेला सुरुवात करीत आहे. जे येतील त्यांच्या सोबत. जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय आता फक्त शिक्षण,आरोग्य,सुविधा,सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा व नागरीकत्व यांच्यापासून वंचित असलेल्या घटकांची सेवा. त्यासाठी ‘गंजाड लोकबिरादरी’ हे मुख्यालय. माझे विद्यार्थी हे माझे भांडवल. कलावंत हे या कामाचे प्रवक्ते. बाबासाहेबांच्या संस्था व बाबासाहेबांचे कुटुंब हा आमचा आदर्श व वंचितांचे ‘वंचितपण’ घालवणे हे ‘ध्येय आणि उद्दिष्ट.’श्रीपती ढोले, मुंबई’आनंदपर्व”गणेशकृपा चाळ, क्रं. 5रूम नं. 3. ‘विराट अंगण’शेजारी, टिटवाळा (पूर्व)मो. 9834875500W.8888578874
RELATED ARTICLES

Most Popular